Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cash Credit: बिझनेस वाढवायचा विचार करताय? कॅश क्रेडिट येईल कामी! जाणून घ्या सविस्तर

Cash Credit: बिझनेस वाढवायचा विचार करताय? कॅश क्रेडिट येईल कामी! जाणून घ्या सविस्तर

Cash Credit: बिझनेस करताय म्हटल्यावर, पैशांच्या सर्वच बाबींवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. कारण, बिझनेस म्हटलं की भांडवल आलेच. ते जर नसले तर तुमचा बिजनेस वाढवायला तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पण, यासाठी तुम्ही कॅश क्रेडिटचा वापर केला, तर तुम्हाला तुमचा बिजनेस वाढवायला नक्कीच मदत होऊ शकेल.

कॅश क्रेडिट म्हणजे बॅंकानी एखाद्या कंपनीला त्यांच्या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेली रक्कम होय. तिलाच शाॅर्ट टर्म फंडिंग किंवा लोनही म्हटल्या जाते. बॅंक कंपनीचा मागील क्रेडिट इतिहास आणि आर्थिक बाबी तपासून कॅश क्रेडिट द्यायचे की नाही ते ठरवते. एकदा ते ठरल्यावर आणि तुम्हाला कॅश क्रेडिट दिल्यावर तुम्ही महत्वाच्या कामासाठी त्या पैशांचा वापर करून तुमची कंपनी वाढवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीसाठी लोकांना कामावर नियुक्त करू शकता, कंपनीचा विस्तार, मिशिनरी आणि प्लांट, कच्चा माल इत्यादी गोष्टी खरेदी करू शकता. तसेच, या पैशांचा वापर तुम्ही बिझनेससाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींसाठी देखील करू शकता.  

कॅश क्रेडिट घेण्यापूर्वी तुमच्याजवळ असलेली मालमत्ता तुम्हाला बॅंकेत तारण म्हणून ठेवावी लागेल. तुम्हाला मिळालेल्या लोनची रक्कम तुम्ही 12 महिन्यात फेडू शकता तसेच, तिला रिन्यूही करू शकता. बिजनेस म्हणून तुम्ही बॅंकेने जेवढी रक्कम मंजूर केलेली असेल तेवढीच घेऊ शकता. एकदा तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर तुम्ही महत्वाच्या गोष्टी मॅनेज करायला, या पैशांचा वापर करू शकता.

कॅश क्रेडिट का आहे खास?

हे अल्प मुदतीचे लोन असून, तुम्ही 12 महिन्यांपर्यंत त्याची परतफेड करू शकता. तसेच, तुम्हाला व्याज फक्त काढलेल्या रकमेवरच द्यावे लागते, जी रक्कम मंजूर झाली आहे, त्या पूर्ण रकमेवर व्याज देण्याची गरज नाही. याचबरोबर, जेवढी रक्कम मंजूर केली आहे, तिच्यातून तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता. तुमचा बिझनेसचा क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास चांगला असल्यास, तुम्ही कॅश क्रेडिटद्वारे मोठी रक्कम मिळवू शकता.

बॅंक आणि वित्तीय संस्था लोन मंजूर करायच्या आधी तुमची वार्षिक उलाढाल आणि परिणाम लक्षात घेऊन मर्यादा ठरवते. तसेच, तुम्ही भरलेल्या व्याजावर तुम्हाला कर सवलतही मिळते. तुम्ही स्वत:च लोन घेत असल्यास, तुम्ही तुमच्या फिक्स्ड डिपाॅझिटवरही कॅश क्रेडिटचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुमचा बिझनेस वाढवण्याबरोबरच तुम्हाला कॅश क्रेडिटचे इतरही लाभ घेता येतात.

कॅश क्रेडिटचा असा करा वापर

तुम्ही एखाद्या बिजनेसचे मालक असून तुमच्याजवळ पाहिजे त्या प्रमाणात कच्चा माल नसल्यास, बिझनेस चालवायला तुम्हाला अडथळा येऊ शकतो. कॅश क्रेडिटसह तुम्ही या गोष्टीतून मार्ग काढू शकता आणि त्वरित पैसे मिळूव शकता. याचबरोबर बिझनेस म्हटल्यावर, तुम्ही ज्या गोष्टी ग्राहकाला पुरवत आहात, त्याचा स्टाॅक तुमच्याजवळ असणे गरजेचा आहे. त्यामुळे कॅश क्रेडिटद्वारे तुम्ही तुमची इन्व्हेंटरी मॅनेज करू शकता आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकता.

उद्योजक म्हणून तुम्हाला कंपनीच्या सर्व बाबींवर लक्ष ठेवावे लागते. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार आणि रेंटचाही समावेश होतो. कॅश क्रेडिटचा वापर तुम्ही या गोष्टींसाठी ही करू शकता. त्यामुळे कॅश क्रेडिटचा वापर केल्यास, तुमच्यावरचा ताण कमी व्हायला मदत होईल. तसेच, कंपनीचा सेल वाढवायचा म्हटल्यावर, तुम्हाला धोरणं ठरवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला मार्केटिंगवर ही पैसा खर्च करावा लागू शकतो. यासाठी तुम्ही कॅश क्रेडिटचा वापर करू शकता.