Commercial LPG Gas Price: ऐण सणासुदीच्या तोंडावर सरकारने पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात 158 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता 19 किलो कमर्शियल LPG गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली असल्याची बातमी एएनआयने (ANI) दिली आहे. याआधी सरकारने घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात केली होती.
नवीन दर आजपासून लागू
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल कंपनीने दरात कपात केल्यामुळे नागरिकांना राजधानी दिल्लीत 19 किलोच्या कमर्शियल LPG गॅस सिलिंडरसाठी 1,522.50 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर आजच म्हणजे, 1 सप्टेंबरपासून लागू केले आहेत. याआधी ऑगस्टमध्ये कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात 99.75 रुपयांची कपात केली होती. तसेच, नवीन दर घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरसाठी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होतात. त्यामुळे हे नवीन दर सरकारने आजपासून लागू केल आहेत. आता सणासुदीची धावपळ सुरू असल्यामुळे सामान्यांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे.
जुलैमध्ये झाली होती दरात वाढ
सिलिंडरचे भाव सातत्याने कमी जास्त होत असते. त्यामुळे सामान्यांना त्यांचा बजेट सेट करायला अडचणींचा सामना करावा लागतो. याआधी जुलैमध्ये देखील कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली होती. ही दरवाढ करायच्या आधी कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या दरात मे आणि जूनमध्ये सुद्धा कपात केली होती. मे महिन्यात OMC ने गॅस सिलिंडरचा दर 172 रुपयांनी कमी केला होता. तर जूनमध्ये फक्त 83 रुपयांची कपात केली होती.
शहरानुसार गॅस सिलिंडरचे दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, नवीन दर कपात केल्यामुळे दिल्लीत आता 19 किलोच्या कमर्शियल LPG गॅस सिलिंडरसाठी 1,522.50 लागणार आहेत. तसेच, मुंबईसाठी 1482.00 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे. तर कोलकातामध्ये 1636.00 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. चेन्नईत कमर्शियल LPG गॅस सिलिंडर 1695.00 मध्ये पडणार आहे. त्यामुळे शहरानुसार कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर (commercial gas cylinder price) मुंबईत कमी असल्याचे दिसून येत आहे.