• 24 Sep, 2023 05:52

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gadar 2 Collection: गदर 2 चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील; रजनीकांतच्या 'जेलर'ची तगडी टक्कर!

Gadar-2 Collection

Image Source : www.in.bookmyshow.com

Gadar 2 Collection: गदर-2 ने खूप कमी वेळात 400 कोटींचा गल्ला मिळवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 490 कोटी रुपयांची कमाई केली आणि लवकरच 500 कोटींचा क्लब गाठण्याची तयारी सुरू केली. गदर-2 च्या यशामुळे ही फिल्म सर्वांत कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील पाचवी फिल्म बनली आहे.

Gadar 2 Box Office Collection: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यावर चित्रित झालेला गदर - एक प्रेम कथा हा चित्रपट 12 वर्षांपूर्वी तुफान गाजला होता. आता याचा पुढचा भाग चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 400 कोटी रुपयांचा पल्ला गाठून 400 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे.

500 कोटीच्या क्लबकडे वाटचाल

गदर-2 ने खूप कमी वेळात 400 कोटींचा गल्ला मिळवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 490 कोटी रुपयांची कमाई केली आणि लवकरच 500 कोटींचा क्लब गाठण्याची तयारी सुरू केली. गदर-2 च्या यशामुळे ही फिल्म सर्वांत कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील पाचवी फिल्म बनली आहे. पठाण आणि गदर-2 या दोन चित्रपटांची तुलना करायची झाली तर, पठाणने वर्ल्डवाईड 1050 कोटी रुपयांची कमाई केली आणि गदर-2 आता कुठे 500 कोटीपर्यंत जात आहे. सध्या या चित्रपटाने 490 कोटींचा गल्ला मिळवला आहे.

सिक्वेलचा धुमाकूळ

गदर-2 आणि ओएमजी-2 या दोन सिक्वेल चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरून प्रेम दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या चित्रपटांची कमाईसुद्धा बक्कळ झाली आहे. अवघ्या दोन आठवड्यात गदर-2 ने 400 कोटींची टप्पा गाठला आहे. तर ओएमजी-2 ने चांगला गल्ला जमवला आहे. खूप दिवसांनंतर गदर-2 या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगचेही रेकॉर्ड मोडले आहेत. यामुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरवाल्यांना संजिवनी मिळाली आहे. सोमवारी या चित्रपटाने 13.50 कोटी रुपयांचा बिझनेस मिळवला. तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी जवळपास 38.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

सध्या चित्रपटगृहांमध्ये OMG-2 हा चित्रपटसुद्धा सुरू आहे आणि त्याचवेळी गदर-2 रिलिज झाला. हे दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. या दोन्ही चित्रपटांनी यापूर्वी चांगला बिझनेस मिळवून दिला होता. पण यावेळी गदर-2 भारी पडल्याचे दिसून येते. OMG-2 या चित्रपटाने आतापर्यंत 114 कोटी रुपयांची कमाई केली. गदर-2 जोरदार टक्कर देऊनही OMG-2 या चित्रपटालाही प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. गदर-2  हा 3500  स्क्रिन्सवर रिलीज झाला होता तर OMG-2 हा चित्रपट 1500 स्क्रिन्सवर रिलीज झाला होता.

रजनीकांतचा जेलर चित्रपटदेखील नेहमीप्रमाणे चांगली कमाई करत आहे. रजनीकांतच्या चाहत्यांसाठी त्याचा चित्रपट येणे यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही. चित्रपटाची स्टोरी कशीही असो. तो फक्त आणि फक्त रजनीकांतच्या नावावर चालतो. यावेळीही या चित्रपटाने 500 कोटींची गल्ला जमवला आहे.