Fulbright-Nehru Fellowships Scheme: फुलब्राइट-नेहरू शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना अमेरिकेत मास्टर्स, पीएचडी करण्यासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीमध्ये तुमचे शिक्षण शुल्क, विमान भाडे, पुस्तके आणि राहण्याचा खर्च समाविष्ट आहे. ही शिष्यवृत्ती 2 आठवडे ते 24 महिन्यांपर्यंत दिली जाते. कला आणि संस्कृती, पर्यावरण, विधी शिक्षण, आरोग्य, विज्ञान, लैंगिक शिक्षण आणि सुव्यवस्था या विषयांतील संशोधनासाठी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवी किंवा 4 वर्षांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. जर पदवीचे शिक्षण हे 4 वर्षांपेक्षा कमी असेल, तर मान्यताप्राप्त भारतीय संस्थेतून पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे नेतृत्व आणि सामुदायिक सेवेतील अनुभवासह प्रस्तावित अभ्यास क्षेत्राशी संबंधित किमान 3 वर्षांचा पूर्णवेळ व्यावसायिक कामाचा अनुभव असावा.
फुलब्राइट-नेहरू फेलोशिपचे 5 प्रकार आहेत
- फुलब्राइट-नेहरू मास्टर फेलोशिप
- फुलब्राइट-नेहरू डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप
- फुलब्राइट-नेहरू पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलोशिप
- फुलब्राइट-नेहरू शैक्षणिक आणि व्यावसायिक उत्कृष्टता फेलोशिप
- फुलब्राइट-नेहरू इंटरनॅशनल एज्युकेशन अॅडमिनिस्ट्रेटर्स सेमिनार
पात्रता काय?
- अर्जाच्या वेळी उमेदवाराने भारतात वास्तव्य केले पाहिजे.
- उमेदवाराचा उत्कृष्ट शैक्षणिक/व्यावसायिक इतिहास असावा.
- अर्जदाराला इंग्रजीचे सर्वोत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. परदेशात वास्तव्य आणि व्यवहार करता येईल असे इंग्रजी असावे.
- मुलाखतीच्या बैठकीनंतर उमेदवार USIEF कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची प्रकृती उत्तम असावी.
- उमेदवाराला यूएस मध्ये ग्रीन कार्ड (कायम निवास) साठी अर्ज करन्याची परवानगी असावी.