Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fukrey 3 Collection: फुकरे 3 ने केली जोरदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी 8 कोटींचा गल्ला

entertainment

Image Source : http://www.in.bookmyshow.com/

Fukrey 3 Collection: फुकरे या कॉमेडी चित्रपट सीरिजचा तिसरा भाग 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटींची कमाई केली आहे.

‘Fukrey 3’  या  फुकरे  कॉमेडी चित्रपट सीरिजचा तिसरा भाग 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. वरुण शर्मा, ऋचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी आणि पुलकित सम्राट या कलाकारांची फौज असणाऱ्या  या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटींची कमाई केली आहे. 

आधीचे दोन भाग हिट

 या सीरिज मधला  पहिला चित्रपट ‘फुकरे’ हा 2013 मध्ये तर  फुकरे रिटर्न्स 2017 मध्ये रिलीज झाला होता. आधीचे दोन्ही पार्ट बॉक्स ऑफिस वर हिट ठरले होते. याच  कॉमेडी सीरिज मधला  ‘फुकरे 3’ हा  तिसरा भाग आहे.

‘मजेदार’ चित्रपट 

मृघदीप सिंग लांबा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित, या चित्रपटात पहिल्या दोन भागांमध्ये झळकलेला अभिनेता अली फजल तिसऱ्या भागात मात्र दिसत नाही . चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी, प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. चित्रपटाला 4 रेटिंग स्टार देऊन चित्रपट समीक्षक तरण आदर्श  यांनी चित्रपटाचे  'मजेदार' म्हणून कौतुक केले आहे.

समीक्षकांचे कौतुक मिळवून देणार कमाई 

चित्रपटाला समीक्षकांकडून मिळणारी कौतुकाची पावती बघता चित्रपट आगामी काळात भरपूर कमाई करेल असे दिसत आहे. त्यातच ‘फुकरे 3’ बरोबर प्रदर्शित झालेल्या कंगना राणावतची भूमिका असलेला 'चंद्रमुखी' आणि नाना पाटेकर यांची भूमिका असलेला 'द व्हॅक्सिन वॉर ' यांना तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. यामुळेही चित्रपटाकडे जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग खेचला जाण्याची शक्यता आहे .