Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FRESH KYC: RBI ने आणले नवे नियम, ग्राहकांना दिलासा

KYC

Image Source : www.bqprime.com

KYC Update प्रक्रियेसाठी आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या ग्राहकांना KYC Update करता येणार आहे. जाणून घ्या काय आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)  KYC प्रक्रियेबाबत काही नवी नियम आणले आहेत.बदलत्या नियमांमुळे KYC अपडेटसाठी आता प्रत्यक्षपणे बँकेच्या शाखेला भेट देण्याची आवश्यकता भासणार नाही. आहे त्या ठिकाणाहून बँकेच्या खातेधारकांना आपले KYC अपडेट करता येणार आहेत. 

केवायसीमध्ये कोणताही बदल झालेला नसल्यास, म्हणजेच ग्राहकाचा पत्ता, मोबाईल नंबर, नाव बदल झालेले नसल्यास त्यांना बँक शाखेत येण्याची गरज भासणार नाहीये. स्व-घोषणापत्र (Self Attested) किंवा री-केवायसी (Re-KYC) अशी ऑनलाईन प्रक्रिया करून ग्राहक बँकेला माहिती कळवू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे.
यांसाठी  दूरस्थपणे व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेचा (V-CIP) (ज्या ठिकाणी बँकांनी सक्षम केली असेल) वापर बँक करू शकते. आरबीआयने देशभरातील बँकांना अशा स्वरूपाच्या विविध सुविधा ग्राहकांना प्रदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकांना त्यांच्या क्षमतेनुसार KYC अपडेटसाठी ऑनलाईन व्यवस्था करायची आहे. ग्रामीण भागात अशाप्रकारे सुविधा दिली जाणार किंवा नाही हे सदर बँक व्यवस्थापनावर अवलंबून असणार आहे. परंतु शहरी भागात या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळणार आहे. 

वेळेची बचत होणार!

बँकामध्ये दर 3 महिन्यांनी KYC प्रक्रिया करणे आवश्यक आहे. कर्जदार ग्राहकांना वेळोवेळी आपली माहिती बँकांना सादर करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेत कमालीचा वेळ खर्च होत असतो. KYC अपडेटची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास नोकरदार वर्गाचा वेळ वाचणार आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता स्व-घोषणापत्र देऊन ऑनलाईन सबमिट करता येणार आहेत.