सध्या बाहेर पावसाने जोर धरला असला तरी रोजचे काम करायला बाहेर पडावेच लागते. पण, पावसामुळे बाहेर पडणे थोड मुश्किलच असते. तसेच, घरात बसले की मच्छरांचाही त्रास असतोच. याच गोष्टीला समोर ठेवून तुम्ही या सिझनमध्ये रेनकोट, छत्री, रबराचे शुज, मच्छरदाणी इत्यादी वस्तू होलसेल मार्केटमधून आणून घरबसल्या किंवा लोकल मार्केटमध्ये विकू शकता. विशेष म्हणजे हा बिझनेस तुम्ही फक्त 25 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. तसेच, यावर चांगला नफा मिळवू शकता.
कमी बजेटमध्ये, जास्त नफा!
रेनकोट, छत्री, रबराचे शुज व मच्छरदानी यांचा बिझनेस सुरू करण्यासाठी कमीतकमी 25 हजार रुपये लागतात. त्यामुळे कोणीही हा बिझनेस सुरू करू शकतो. कारण, पावसाळ्यात या गोष्टींना सर्वाधिक मागणी असते. तसेच, प्रत्येक वस्तू मागे तुम्ही अंदाजे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत नफा मिळवू शकता. त्यामुळे अगदी कमी रक्कम गुंतवूण तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. जर तुम्हाला हा बिझनेस ऑनलाईन सुरू करायचा असल्यास, यात वाढ होवू शकते. ते अंदाजे 50 हजार ते 75 हजारापर्यंत जावू शकते. त्यामुळे बिझनेस सुरू करायच्या आधी तुम्हाला या गोष्टींवर काम करावे लागेल. ते एकदा ठरल्यावर तुम्ही बाकीच्या गोष्टी सहजरित्या करू शकता.
वस्तू कुठून आणायच्या?
तुम्ही कोणत्याही शहरातील होलसेल मार्केटमधून या गोष्टी मिळवू शकता. तेथे तुम्हाला अगदी स्वस्त दरात या गोष्टी मिळू शकतील. तसेच, काही होलसेलरच्या स्वत:च्या वेबसाईट आहेत. त्याची चाचपणी करून तुम्ही या गोष्टी ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात हा बिझनेस सुरू करायचा असल्यास, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणावरूनही छत्री, रेनकोट व अन्य पावसाळी गरजेचं साहित्य खरेदी करू शकता. मुंबईत क्राफर्ट मार्केट आणि दादरला अशा वस्तू योग्य दरात मिळतात.
वस्तू विकायच्या कुठे?
तुम्ही राहता त्या ठिकाणी जवळपास आठवडी बाजार भरत असल्यास, तेथेही तुम्ही विक्री करू शकता. फक्त त्यांचे काही चार्ज असल्यास ते तुम्हाला द्यावे लागू शकतात. तसेच, तुम्ही हा बिझनेस घरबसल्याही करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला थोडी तरी तांत्रिक बाबींची माहीती असणे आवश्यक आहे. ती असल्यास, तुम्ही स्वत:ची वेबसाईट, व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवून या गोष्टी विकू शकता. तसेच, अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट अशा ई-काॅमर्स वेबसाईटवर नोंदणी करून विकू शकता.
फक्त यासाठी काही चार्ज भरावा लागू शकतो. सगळ्यांनाच हे करता येणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार जो नफा मिळवून देईल तो पर्याय निवडून हा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये हा बिझनेस सुरू करू शकता. त्यातून मिळणारा नफा चांगला आहे. फक्त कुठून वस्तू आणायच्या आणि कोणती पद्धत वापरायची यावर काम करणे गरजेचे आहे.