Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instagram Filter Feature: नवीन फिल्टर कसे शोधायचे आणि इतरांच्या स्टोरीमधील फिल्टर सेव्ह कसे करायचे, हे जाणून घ्या

Instagram Filter Feature

Instagram Filter Feature: इन्स्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे 'फिल्टर फिचर'. स्टोरीमध्ये फिल्टर कसा अ‍ॅड करायचा हे अनेकांना माहित नसते. ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की लेख वाचा.

Instagram Filter Feature: सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणावर इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात इन्स्टाग्रामचे लाखो युजर्स आहेत. यावरून फोटो, रील्स, व्हिडीओ असा कंटेन्ट शेअर करून अनेक जण लाखोंची कमाई करत आहेत. इन्स्टाग्रामही वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच करत असते. याच फीचर्समधील एक आकर्षक फीचर म्हणजे फील्टर(Filter) होय. हा फिल्टर स्टोरीमध्ये कसा अ‍ॅड करायचा हे अनेकांना माहित नसते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये Filter Feature अ‍ॅड कसा करायचा?

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप ओपन करून डाव्याबाजूच्या वर असणाऱ्या स्टोरीच्या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर कॅमेरा हा पर्याय निवडा
  • त्यामध्ये तळाला असणाऱ्या सर्व फिल्टर पर्यायांपैकी शेवटच्या ‘Browse effect’ या पर्यायापर्यंत स्क्रोल करा
  • Browse effect पर्याय निवडल्यानंतर, फिल्टरचे पेज ओपन होईल
  • सर्च पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहित असलेले फिल्टर शोधू शकता

इतरांच्या स्टोरीमधील Filter कसे सेव्ह करायचे

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप ओपन करून त्यात तुम्हाला ज्या स्टोरीतील Filter सेव्ह करायचे आहे त्या स्टोरीवर क्लिक करा
  • एखाद्या स्टोरीमध्ये फिल्टर वापरला असेल, तर त्या व्यक्तीच्या नावाखाली त्या स्टोरीमध्ये वापरण्यात आलेल्या फिल्टरचे नाव देण्यात आलेले असते, त्यावर क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर काही पर्याय उपलब्ध होतील.त्यापैकी ‘Try It’ हा पर्याय निवडा
  • तुम्हाला तो फिल्टर कसा आहे ते पाहता येईल व त्यानंतर ‘Try It’च्या वर असणारा Save पर्याय निवडुन तो फिल्टर सेव्ह करा