Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतात इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे 5 मार्ग!

indtagram social media day 2022 earn money from social media

Earning Money on Instagram : इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर IGTV जाहिराती, ब्रण्डेड सामग्री, बॅज, शॉपिंग आणि एफिलिएट मार्केटिंगच्या मदतीने पैसे कमवता येतात. काही व्हिडिओ क्रिएटर स्पॉन्सर्ड कंटेट आणि फॅन्सनी तयार केलेल्या डेटाचा परवानगी घेऊनही चांगली कमाई (How to make Money on Instagram in India) करता येऊ शकते.

World Social Media Day 2022 : इंस्टाग्रामचे भारतात जवळपास 180 दशलक्ष युझर्स आहेत; आणि भारतात ही संख्या हळुहळू वाढतच आहे. त्यामुळे साहजिकच, सोशल मिडियावरील भारतातील बरेच युझर्स इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. जुलै, 2020 मध्ये, केंद्र सरकारने भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर Instagram ने भारतात Reels आणले. या प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामने फूल-स्क्रीन जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे; ती आता 1 मिनिटापर्यंत चालू शकते.

जागतिक पातळीवर भारताला व्हिडिओ डेटाची प्राथमिक बाजारपेठ मानले जाते. देशातून सुमारे 70 ते 80 टक्के व्हिडिओ डेटा सोशल मिडिया साईटवर अपलोड होतो. YouTube ने YouTube Shortsच्या माध्यमातून 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. इन्स्ट्राग्रामनेही इतर प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी Instagram IGTV आणि Reels वर जोर दिला आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म डेटा क्रियेट करणाऱ्या युझर्सना 1 अब्ज डॉलर्सचे प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा आणि त्यांचा गौरव करण्याचा विचार करत आहे. 


Instagram वरून किती पैसे कमवू शकता?

जर तुम्ही स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ क्रिएटर म्हणून प्रस्थापित केले असेल, तर तुमच्यासाठी इन्स्टाग्रामवर पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर IGTV जाहिराती, ब्रण्डेड सामग्री, बॅज, शॉपिंग आणि एफिलिएट मार्केटिंगच्या मदतीने पैसे कमवता येतात. काही व्हिडिओ क्रिएटर स्पॉन्सर्ड कंटेट आणि फॅन्सनी तयार केलेल्या डेटाचा परवानगी घेऊनही चांगली कमाई करता येऊ शकते. इन्स्टाग्रामवरील युझर्स एका महिन्याला किमान एवढे पैसे कमावतात, असे सांगणे अवघड आहे. पण Instagram प्लॅटफॉर्मवर असलेले काही प्रसिद्ध युझर्स प्रत्येक प्रायोजित (Sponsored) पोस्टसाठी खालीलप्रमाणे पैसे कमावतात.

Instagram Top Celebrity

साधारणत: 5 ते 10 हजार फॉलोअर्स असलेल्या युझर्सला प्रत्येक पोस्टमागे सरासरी 6,531 रूपये मिळतात. 50 ते 80 हजार फॉलोअर्स असलेल्या युझर्सला प्रति पोस्टमागे सुमारे 14,843 रूपये आणि 1 लाखाच्या पुढे म्हणजे 2.5 ते 5 लाख फॉलोअर्स असलेल्या युझर्सच्या प्रत्येक पोस्टला अंदाजित 49,725 रूपये मिळतात. अर्थात हे आकडे स्थिर राहत नाही. यात सतत बदल होत असतात. युझर्सचे ठिकाण, त्याचे विषय आणि फॉलोवर्सची संख्या यावर बरेच काही अवलंबून असते. तसेच काही जाहिरातदार थेट युझर्सचा वापर करून त्यांना थेट पैसे (Earning Money on Instagram) देतात. त्यामुळे युझर्सला नेमके किती पैसे मिळतात, हे सांगणे कठीण आहे.

भारतात इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे 9 मार्ग उपलब्ध आहेत.

1. ब्रॅण्ड भागीदारी (Brand Partnerships)

कंटेट क्रिएटर म्हणून तुम्ही विविध ब्रॅण्डस्ची उत्पादने आणि सेवांचा प्रचार करणाऱ्या कंपन्यांसोबत बत भागीदारी करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला इन्स्टाग्रामने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही औषधे आणि हत्यारांसारख्या उत्पादनांचा प्रचार करू शकत नाही. स्पॉन्सर्ड कंटेटमधून मिळणारे पैसे हे तुमच्या फॉलोवर्सची संख्या आणि तुम्ही या प्लॅटफॉर्मवर किती वेळ उपलब्ध असता यावर अवलंबून असते.

2. प्रोमोटेड अफिलिएट लिंक्सचा वापर (Promote Affiliate Links)

एफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्ही विविध कंपन्यांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा प्रचार करून कमिशन मिळवू शकता. कंटेट क्रिएटर म्हणून तुम्ही तुमच्या फॉलोवर्ससोबत विविध उत्पादने आणि सेवांचा प्रचार करू शकता. यासाठी विविध नेटवर्क जंक्शनचा वापर करू शकता. इन्स्टाग्रामवरील युझर्स आपल्या बायो प्रोफाईलद्वारे, फोटो कॅप्शन, व्हिडिओ आणि पोस्टद्वारे अफिलिएट लिंक्स फॉलोअर्सशी शेअर करू शकतात. यातून युझर्सला किमान 5 ते 15 टक्के कमिशन मिळू शकते.

3. स्पॉन्सर्ड कंटेट (Sponsored content)

बरेच ब्रॅण्ड उत्पादक त्यांच्या प्रोडक्टचे प्रमोशन करण्यासाठी Instagram युझर्ससह भागीदारी करतात. यात कंपन्या युझर्सना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी युझर्सबरोबर करार करून कंपनीचा स्पॉन्सर्ड कंटेट युझर्सच्या अकाऊंटवरून प्रसिद्ध केला जातो. अशा प्रकारच्या भागीदारीत कंपनीसोबत झालेल्या करारानुसार पोस्ट आणि व्हिडिओची संख्या ठरवून त्यानुसार प्रचार केला जातो. इथे काही कंपन्या प्रत्येक पोस्टनुसार तर काही कंपन्या संपूर्ण पॅकेजनुसार पैसे देतात. अर्थात यात युझर्सच्या फॉलोअर्सची संख्या आणि त्यांच्याशी असलेली अन्गेजमेंटवर याचे दर ठरतात.

4. शॉपिंग (Shopping)

जर तुमचे एखादे प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला ते Instagram वर विकायचे असेल, तर इन्स्टाग्रामवर तसे स्टोअर सेट करण्याची रचना आहे आणि यासाठी इन्स्टा परवानगी देतं. इथे तुम्ही कर्मिशिअर खाते सुरू करून तुमची प्रोडक्ट विकण्यासाठी ठेवू शकता. त्याचा प्रचारही करू शकता. तुम्ही तुमची वेबसाइटही Instagram जाहिरातींसह कनेक्ट करू शकता.

5. IGTV जाहिराती

IGTV हा तुमच्या फॉलोअर्सची कनेक्ट होण्याचा एक पॉवरफूल मार्ग आहे. IGTV जाहिरातींसह, तुम्ही तयार केलेल्या तुमच्या कंटेटद्वारे पैसे मिळवू शकता. जेव्हा तुम्ही Instagram वर एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट टाकता. तेव्हा त्या पोस्ट व व्हिडिओमध्ये विविध ब्रॅण्डस्ना जाहिरात करण्याचा पर्याय दिल्यास तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. यातून तुम्हाला जाहिरातीच्या उत्पन्नातून 55 टक्के हिस्सा मिळू शकतो. 

Instagram वर एक कंटेट क्रिएटर म्हणून तुम्ही अक्टीव्ह असाल आणि यातून कमाईसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही इन्स्टा प्लॅटफॉर्मवरील धोरणांचं पालन केले पाहिजे. जर तुम्हाला नवीन नियमांची माहिती नसेल, तर ती तुम्ही वेळ काढून वाचून समजून घ्यायला हवी. अर्थात शेवटी एक Instagrammer म्हणून तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना किती चांगल्या प्रकारे गुंतवू शकता. यावर तुमचे उत्पन्न अवलंबून आहे.