Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shankar Mishra Case: विमान प्रवासात 'हे' नियम पाळा नाहीतर अडचणीत याल; भोगावी लागेल शिक्षा

Shankar Mishra Case

Shankar Mishra Case: विमानप्रवास करताना प्रवाश्यांनी नियम पाळले नाहीत आणि गैरवर्तणूक किंवा कोणताही गुन्हा केला तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Shankar Mishra Case: एअर इंडियाच्या(Air India) न्यूयॉर्क ते मुंबई थेट विमानात एक घृणास्पद प्रकार घडल्यामुळे सध्या एअर इंडिया चर्चेत आलंय. घडलं असं की शंकर मिश्रा (Shankar Mishra)या वेल्स फार्गो बँकेच्या (Wells Fargo) भारतातल्या उपाध्यक्षाने अलीकडेच न्यूयॉर्कहून मुंबईला(New York to Mumbai) येणाऱ्या विमानात मद्यधुंद अवस्थेत आपल्या सहप्रवासी महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केली. ही सहप्रवासी 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक होती. तेव्हापासून या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झालीये. या घटनेसाठी एअर इंडियाने शंकर मिश्रा यांना 30 दिवसांसाठी नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकलंय, यासोबतच या घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालकांना(DGCA) दिली असून चौकशी करण्याचे आदेशही दिले आहे.  या सर्व प्रकरणानंतर विमान प्रवास करताना कोणते नियम(Rules) नाही पाळले किंवा गैरवर्तन अथवा गुन्हा केला तर काय शिक्षा होते आणि किती दंड आकारला जातो यावर चर्चा होत आहेत. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

तक्रार कुठे केली जाते? 

विमानप्रवासामध्ये प्रवाश्यांनी गैरवर्तन किंवा कोणताही गुन्हा केला तर त्याची तक्रार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडे(Directorate General of Civil Aviation) करता येते. त्यांनतर प्रवाश्याला त्याचा गुन्हा किंवा वर्तणूक पाहून शिक्षा करण्यात येते.  
2017 मध्ये, नागरी उड्डाण मंत्रालयाने नॅशनल नो-फ्लाय लिस्टसाठी(National No-Fly List)  मसुदा नियमांचे अनावरण केले. त्या अगोदर, गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना निलंबित करणे हे एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूकीच्या निर्णयावर अवलंबून होते. 2017 मध्ये शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड(Ravindra Gaikwad) यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्यानंतर हे नियम तयार करण्यात आले.

या गुन्ह्यांसाठी मिळते 'ही' शिक्षा('This' punishment is given for these crimes)

  • लेव्हल 1 या प्रकारातील गुन्ह्यांमध्ये अयोग्य शारीरिक हावभाव, शाब्दिक छळ आणि अनियंत्रित मद्यपान यासारख्या कृतींचा समावेश होतो. या वर्तनासाठी प्रवाशाला 3 महिन्यांपर्यंत नो-फ्लाय लिस्टमध्ये(No Fly List) टाकले जाऊ शकते
  • लेव्हल 2 या प्रकारातील गैरवर्तनामध्ये एखाद्याला ढकलणे, लाथ मारणे, थप्पड मारणे किंवा इतर शारीरिक अपमानास्पद वर्तन घडले तर अशा वर्तनासाठी 6 महिन्यांपर्यंत बंदी(Ban) लागू करण्यात येऊ शकते
  • लेव्हल 3 या प्रकारातील गुन्ह्यांमध्ये जीवघेणे वर्तन असू शकते, जसे की खुनी कृती, एखाद्याला गुदमरून मारणे, खुनी हल्ला किंवा विमान प्रणालीला हानी पोहोचवणे यासारख्या गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. या कृतीसाठी किमान 2 वर्षे बंदी(Ban) घातली जाऊ शकते व ती आयुष्यभर पुढे वाढवलीही जाऊ शकते
  • गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काही प्रकरणांमध्ये, प्रवाशाला त्यांच्या डेस्टिनेशनवर(Destination) उतरल्यावर लगेच अटकही केली जाऊ शकते
  • याशिवाय, गृह मंत्रालय 'DCGA' ला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या आणि अनिश्चित काळासाठी नो-फ्लाय लिस्टमध्ये(No Fly List) ठेवलेल्या व्यक्तींची यादी देखील सादर करते

फ्लाइटचा पायलट-इन-कमांड एअरलाइनला करतो तक्रार(in-command of the flight makes a complaint to the airline)

जेव्हा एखादा प्रवासी अनपेक्षित व अनियंत्रित वर्तन करतो, तेव्हा फ्लाइटचा पायलट-इन-कमांड एअरलाइनला त्याची तक्रार करतो. त्यानंतर विमान कंपनी या घटनेची चौकशी करते व त्यानुसार शिक्षा देते. एअरलाइन्सच्या समितीने निर्णय घेतल्याच्या 60 दिवसांच्या आत प्रवासी अशा कोणत्याही बंदीच्या विरोधात उपाय मागू शकतात. जर विमान कंपनी 30 दिवसांच्या आत निर्णयावर आली नाही तर प्रवाशावरील शुल्क वगळले जाते. ज्या प्रवाश्याला नो प्लाय लिस्टमध्ये(No Fly List) कंपनीने जोडले आहे त्या कंपनी ऐवजी दुसऱ्या कंपनीने त्या प्रवाश्याला नो प्लाय(No Fly List) लिस्टमध्ये जोडायचे की नाही, हा सर्वस्वी त्या कंपनीचा वैयक्तिक निर्णय असेल.