• 05 Feb, 2023 13:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैशांची बचत करा

Money Saving Tips

Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.

Money Saving Tips: आपण बऱ्याच वेळा पैसे वाचवण्याचा विचार करतो, मात्र आपल्या अनेक सवयींमुळे  महिन्यापाठी आपल्या अकाउंटमध्ये खळखळाट पाहायला मिळतो. तो खळखळाट पाहून आपल्याला बचतीचे मूल्य कळते. आज आम्ही तुम्हाला अगदी छोट्या बचतीच्या टिप्स(Saving Tips) सांगणार आहोत, त्या जर तुम्ही काटेकोरपणे पाळल्या तर वर्षाच्या शेवटी तुमच्या अकाउंटमध्ये बऱ्यापैकी चांगली रक्कम पाहायला मिळेल. टिप्स जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

शॉपिंग लिस्ट बनवा(Make a shopping list)

जर तुम्हालाही शॉपिंग करायला आवडत असेल तर शॉपिंग करण्यापूर्वी खरेदी करणाऱ्या गोष्टींची एक चेकलिस्ट(checklist) तयार करा. यामुळे अनावश्यक खर्च टाळला जातो. तज्ज्ञांच्या मते जेव्हा लोक क्रेडिट कार्ड(Credit Card) किंवा गिफ्ट कार्डने(Gift Card) खरेदी करतात, तेव्हा ते लक्झरी वस्तूंची बेपर्वा खरेदी करतात. क्रेडिट कार्डवरून कमीत कमी खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

रिवॉर्ड पॉइंट्स क्लेम करायला विसरू नका(claim reward points)

शॉपिंग स्टोअर्स आणि वेबसाईटवरील लक्झरी उत्पादनांच्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट(Reward points) देण्यात येतात. या रिवॉर्ड पॉइंट्सचा क्लेम करायला विसरू नका. खरेदी करण्यापूर्वी तुमचे रिवॉर्ड पॉइंट गोळा करून त्याचा लाभ खरेदी करताना घ्या. जेणेकरून तुमचे पैसे वाचतील.

फिटनेसवर हुशारीने खर्च करा(Spend wisely on fitness)

जिमच्या सदस्यत्वावर पैसे खर्च करण्याऐवजी घरीच व्यायाम करणे किंवा फिरायला जाणे कधीही चांगले. बऱ्याच वेळा लोक वर्षभराची फी(Fees) भरून एका महिन्यातच जिमला जाणे सोडतात. अशा वेळी तुमचे पैसेही वाया जातात. त्याऐवजी व्यायामशाळेत महिनाभर फिटनेस मंत्र शिकून घ्या आणि नंतर ते घरीच करायला सुरुवात करा. यामुळे तुमचे 11 महिन्यांचे जिमचे पैसे वाचतील.

दररोज 1 रुपयांनी गुंतवणूक वाढावा(Increase by Rs.1 per day)

लहानपणी आपण पिगी बँकमध्ये पैसे गोळा करायचो. तीच सवय आता देखील सुरु करा. दररोज 1 रुपयाची गुंतवणूक करा आणि ती प्रत्येक दिवसाच्या अनुषंगाने वाढवत जा. उदा. पहिल्या दिवशी 1 रुपया सेव्ह करा, दुसऱ्या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी तीन असे करत दिवसागणिक गुंतवणूक 1 रुपयाने गुंतवणूक वाढवत जा. 1 वर्ष तुम्ही कसोशीने गुंतवणूक केली तर 365 दिवसानंतर तुमच्याकडे 66, 795 रुपये साठतील.

हुशारीने खर्च करा(Spend wisely)

हल्ली लोक प्रवासावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगतो तिचा अवलंब करा. कोणत्याही ब्रँडेड कंपनीसोबत फिरायला जाण्याऐवजी स्टार्टअप(Startup) असणाऱ्या कंपन्या किंवा हल्ली बरेच व्हाट्सअँप ग्रुप सुद्धा कॅम्पिंग, ट्रेकिंग इव्हेन्ट ऑर्गनाईज करतात. या ग्रुपसोबत जा जेणेकरून तुम्ही कमी पैशात फिरण्याचा आनंद लुटू शकता. याशिवाय कमी अंतराच्या ठिकाणी टॅक्सी किंवा रिक्षा करण्याऐवजी चालत जा. पैसेही वाचतील आणि फिटही राहाल.