Money Saving Tips: प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा(Money) हा अतिशय महत्त्वाचा असतो. नोकरदारासाठी तर महिन्यापाठी सेव्हिंग(Saving) करणे फार मुश्किलीचे जातात. महिना संपायला आला की आपले खिसे देखील खालीच असतात. पण हे खिसे खाली होण्यासाठी देखील आपणच जवाबदार असतो. प्रत्येक अडीअडचणीत माणसाला पैसा कामी येतो त्यामुळे पैशाची बचत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर महिन्यापाठी तुमचंही पाकीट खाली होत असेल किंवा मुळातच तुमचा पगार(Salary) कमी असेल तर जास्तीत जास्त सेव्हिंग कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. चला तर आजच्या लेखातून पगार कमी असतानाही जास्तीत जास्त सेव्हींग कशी कराल याबद्दल जाणून घेऊयात.
कमी पगार असणाऱ्यांनी पगाराचे नियोजन(Salary planning) करणे अतिशय गरजेचे आहे. कमी पगार असताना सुद्धा तुम्ही जर चोख पैशाचे नियोजन केले तर तुम्ही देखील बक्कळ रक्कम सेव्ह(Saving) करू शकता.
आधी बचत मग खर्च
- शाँपिंगला(Shopping) जाण्यापूर्वी आवश्यक वस्तुंची एक यादी तयार करा आणि गरजेपुरत्याच वस्तू खरेदी करा. जेणेकरून अनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर रोख लागेल व तुमचे पैसे वाचतील
- कोणत्याही गोष्टी खरेदी केल्यानंतर त्याबाबतची नोंद ठेवायला शिका. त्यामुळे तुम्हाला तुम्ही किती पैसे खर्च करता हे लक्षात येईल
- जर तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा पगार कमी असेल तर तर luxurious किंवा ब्रँडेड(Brand) वस्तू वापरण्याऐवजी साध्या पण टिकाऊ व उत्तम दर्जाच्या वस्तुंना प्राधान्य द्या, व त्याच खरेदी करा
- गरज असेल तर आणि तरच पैसे खर्च करा
- बाहेर गेल्यावर भूक नसतानाही उगाचच खाण्यावर वायफळ खर्च करू नका
- मॉल(Mall), रिटेल हब(Retail Hub) यासारख्या ठिकाणी खरेदी करण्यापूर्वी तेथील ऑफर(Offer) आणि सेल(Sale) यासंदर्भात चौकशी करा व वस्तूच्या किंमती(Price) वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चेक करा
- तुमच्या पगाराचा 25 ते 30 टक्के हिस्सा महिन्याला सेव्हिंगसाठी बाजूला काढा व उर्वरित पैशात तुमचा खर्च बसावा. ही सवय जर तुम्हाला लागली तर नक्कीच तुम्ही बऱ्यापैकी रक्कम सेव्हिंग करू शकता.
पैशाची सेव्हींग करणे का गरजेचे आहे?
पैशाची सेव्हींग ही काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तुम्हाला जर फायनान्शिअल स्टॅबिलीटी(Financial Stability) मिळवायची असेल तर पैशाची बचत करायला हवी. कारण सेव्हींग केलेला पैसा कधीही अडचणीच्या वेळी कामी येतो. मग ती आर्थिक अडचण असो की आरोग्याच्या समस्या, पैशाशिवाय काहीच सोडवता येत नाहीत. त्यामुळे पैशाची सेव्हींग करणे गरजेचे आहे.