बँकचे क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पाँइंट ते राष्ट्रीय पेन्शन सिस्टिममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाले आहेत. तुम्हाला नवे नियम माहिती नसतील तर ऐनवेळी अडचण येऊ शकते. पुढील वर्षी जानेवारीपासून आर्थिक व्यवसाय करताना हे नियम बदलणार आहेत.
Table of contents [Show]
राष्ट्रीय पेन्शन सिस्टिमधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल खासगी क्षेत्रातील NPS खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू असणार नाहीत. स्वयंघोषित (सेल्फ डिक्लरेशन) पद्धतीने अर्ज करून पेन्शन फंडातील रक्कम केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्वायत्त संस्थातील कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून नियमांमध्ये काही सूट दिली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंद केली आहे. 1 जानेवारीपासून नवे नियम लागू होणार आहेत.
एसचडीएफसी रिवॉर्ड पॉइंटमधे बदल
HDFC बँकने 1 जानेवारीपासून क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. फ्लाइट, हॉटेल बुकिंगवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सवर प्रति महिना मर्यादा घातली आहे. HDFC bank smart buy portal वर याबाबत माहिती देण्यात आली आहे. Infinia कार्डसाठी दीड लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे तर Diners Black साठी ७५ हजार मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर इतर प्रकारच्या कार्डसाठी ५० हजारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट -
जर तुम्ही एचडीएफीच्या क्रेडिट कार्डद्वारे घराचे भाडे देत असाल तर १ जानेवारीपासून तुम्हाला १ टक्के रक्कम जास्त द्यावी लागेल. तसेच रेंट पेमेंटसाठी कोणतेही रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. तसेच एकाच महिन्यात दोन रेंट पेमेंट करत असाल तर त्यासाठीही शुल्क लागू असेल.
विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी KYC अनिवार्य
१ जानेवारीपासून विमा पॉलिसी खरेदी करताना KYC अनिवार्य करण्यात आली आहे. विमा नियामक संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. जीवन, आरोग्य, वाहन, गृह, प्रवास कोणत्याही प्रकारचा विमा काढण्यासाठी KYC अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वप्रथम विमा कंपनीला तुमचे कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतरच पॉलिसी खरेदी करता येईल.
एसबीआय क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉइंट (credit card reward points)
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटच्या नियमावलीत बँकेने बदल केले आहेत. १ जानेवारी २०२३ पासून नवे नियम लागू होणार आहेत. अॅमेझॉनवरील शॉपिंगसाठी मिळणारे 10X रिवार्ड पॉईंट 5X करण्यात आले आहेत. मात्र, अपोलो फार्मसी, बुक माय शो, क्लिअर ट्रिप, इझीटायनर, लेन्सकार्ट, नेटमेड्सवरील शॉपिंगसाठी 10X रिवार्ड पॉइंट्स मिळणार आहेत.