Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केटमध्ये सर्किट फिल्टर कधी लावतात, जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये सर्किट फिल्टर कधी लावतात, जाणून घ्या

Stock Market Circuit Filters / Circuit Breakers - स्टॉक (Stock Market) किंवा इंडेक्समध्ये (Index) अत्यंत कमी वेळेत कोणतीही मोठी हालचाल होऊ नये, म्हणून व्यापारी व गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी मार्केटमध्ये सर्किट फिल्टर (Circuit Filter) लावण्याचा निर्णय घेतला जातो.

ही प्रत्येक इंडेक्स किंवा स्टॉकसाठी निर्धारित केलेली श्रेणी आहे. यात वरची (Upper Circuit) आणि खालची (Lower Circuit) मर्यादा सेट केलेली असते. ही मर्यादा मागील दिवसाच्या बंद किमतीवर आधारित असते. जेव्हा कोणत्याही स्टॉकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाढ किंवा घसरण होते तेव्हा त्या स्टॉकमधील ट्रेडिंग सर्किट लावून थांबवली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या शेअरची किंमत 100 रुपये असेल आणि सर्किट फिल्टर 10 टक्के असेल, तर त्या शेअरची किंमत 110 रुपयांवर जाताच त्याची खरेदी-विक्री थांबवली जाते. अशाच पद्धतीने शेअरची किंमत खाली आल्यावर त्याच्यातील ट्रेडिंग थांबवली जाते. सर्किट फिल्टर हे सेबीद्वारे (SEBI) सेट केले जातात.

स्टॉक एक्सचेंजसाठी सर्किट कसे काम करते?

एनएसई (NSE) किंवा बीएसई (BSE) मधील निफ्टी (Nifty) आणि बॅंकनिफ्टी (BankNifty) किंवा सेन्सेक्स (Sensex) यासारखे निर्देशांक एका दिवसात किती वर-खाली जाऊ शकतात, हे सर्किट लिमिटद्वारे ठरवले जाते. यामध्ये 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्के वाढ किंवा कमी झाल्यास फिल्टर लागू केले जातात; यानंतर कूलिंग ऑफ पीरिअड लागू होतो. सेबीने निर्देशांकांसाठी 10 टक्के, 15 व 20 टक्के आणि सिक्युरिटीजसाठी 2, 5, 10, 15 आणि 20 टक्के अशी सर्किट ब्रेकर मर्यादा सेट केली आहे.

या मर्यादा का आहेत?

स्टॉक किंवा इंडेक्समध्ये अत्यंत कमी वेळेत कोणतीही मोठी हालचाल होऊ नये, म्हणून व्यापारी व गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी स्टॉक एक्सचेंजेस हा निर्णय घेते. तसेच, तुम्ही प्राईस बँडच्या बाहेर ऑर्डर दिल्यास ती ब्रोकरकडून नाकारली जाऊ शकते. त्यामुळे मर्यादित ऑर्डर देण्यापूर्वी स्टॉकची सर्किट मर्यादा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्किट फिल्टर कोणतीही बातमी सकारात्मक आणि नकारात्मक पद्धतीने आल्यास ते स्टॉकची अस्थिरता (Volatility) मर्यादित करते. अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये 1987 च्या बॅक मंडे क्रॅशनंतर सर्किट ब्रेकर सेट केले गेले.

सर्किट फिल्टर ब्रेक झाल्यानंतर काही कालावधीने प्री-ओपन कॉलचा लिलाव सुरू केला जातो.

ट्रिगर लिमिट

ट्रिगर टाईम

बाजार थांबवण्याचा कालावधी

प्री-ओपन कॉल लिलाव सत्राचा कालावधी

10टक्के

दुपारी1:00च्या अगोदर

45 मिनिटे

15 मिनिटे

दुपारी  1:00 ते 2.30 पर्यंत

15 मिनिटे

15 मिनिटे

दुपारी 2.30 किंवा त्यानंतर

थांबत नाही

लागू नाही

15टक्के

दुपारी1:00च्या अगोदर

1 तास45 मिनिटे

15 मिनिटे

दुपारी  1:00 ते 2. 00 पर्यंत

45 मिनिटे

15 मिनिटे

दुपारी  2:00किंवा त्यानंतर

दिवसभरासाठी

लागू नाही

20टक्के

बाजाराच्या वेळेत कधीही

दिवसभरासाठी

लागू नाही

स्त्रोत :NSE Circuit Breakers ( NSE - National Stock Exchange of India Ltd. (nseindia.com)  

फ्युच्युर आणि ऑप्शन (Futures and Options - F&O) स्टॉकसाठी सर्किट मर्यादा कशा लागू होते?

ज्या बिजकावर साधित (derivative) उत्पादने उपलब्ध आहेत, त्यावर कोणताही प्राईस बँड लागू होत नाही. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना योग्य नसलेल्या किमतीवर ऑर्डर देण्यापासून रोखण्यासाठी निर्देशांकाने (Exchange) 10 टक्केची ऑपरेटिंग कॅटेगरी निश्चित केली आहे. जर स्टॉक खालून किंवा वरून 10 टक्क्यांनी सर्किटवर आला, तर काही मिनिटांत, स्टॉकची सर्किट मर्यादा 5 टक्क्याने वाढेल. अशाप्रकारे स्टॉक सर्किट्स 10, 15, 20 आणि 25 टक्क्याने वाढत जाईल. अशाप्रकारे फ्युच्युर आणि ऑप्शन स्टॉकमध्ये सर्किट्स लागू केले जातात.

आतापर्यंतचे सर्किट ब्रेकिंग इव्हेंट (Past Circuit Breaking events)

  • 23 मार्च, 2020 रोजी, सकाळी 9:58 वाजता सेन्सेक्स (Sensex) 2,991 अंकांनी (10 टक्क्यांनी) तर निफ्टी (Nifty) (9.40 टक्क्यांनी) 822 अंकांनी घसरून 7,923 वर आला आणि त्याचवेळी लोअर सर्किट ब्रेकर अलर्ट झाला. त्यावेळे एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) दोन्हीवरील ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी थांबवण्यात आले.
  • 13 मार्च 2020 रोजी, सकाळी 9:20 वाजता निफ्टी 966 अंकांनी घसरून (10.07 टक्के) 8,625 वर आल्याने निफ्टीवरील ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी थांबवण्यात आले होते.
  • 18 मे 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत युपीए सरकार विजयी झाल्यामुळे मार्केट एका दिवसात दोनदा अप्पर सर्किट्पर्यंत गेले होते.  
  • 21 जानेवारी 2008 मध्ये, जागतिक मंदी आणि व्यापार निलंबित झाल्यामुळे सेन्सेक्स 10 टक्क्यांनी खाली आला होता.
  • 17 ऑक्टोबर 2007 मध्ये, पार्टिसिपेटरी नोट्सवरील (Participatory Notes) नियम कडक केल्यामुळे मार्केट लोअर सर्किट ब्रेकरवर आदळल्याने ट्रेडिंग थांबले होते.
  • 22 मे 2006 मध्ये, पेमेंटच्या विषयावरून लोअर सर्किट ब्रेकर अलर्ट झाले होते.
  • 17 मे 2004 मध्ये, NDA सरकार निवडणुकीत हरल्याने लोअर सर्किट हिट झाले होते.

सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर लागल्याने छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होण्यास मदत होते. तसेच काही गुंतवणूकदारांचा मार्केटमध्ये अचानक झालेल्या वाढीने आणि लोअर डाऊनमुळे गोंधळ होऊ शकतो. त्यांना पुन्हा एकदा विचार करून नव्याने निर्णय घेण्यासाठी सर्किट फिल्टर व सर्किट ब्रेकरचा फायदा मिळतो. त्यांना पुन्हा एकदा विचार करून नव्याने निर्णय घेण्यासाठी सर्किट फिल्टर व सर्किट ब्रेकरचा फायदा मिळतो.