Sant Gadge Baba Amravati University : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना 1 मे 1983 महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवशी पश्चिम विदर्भाचे विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती येथे झाली. विदर्भ ही संतांची भूमी आहे. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांचे नाव 4 मे, 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने या विद्यापीठाला दिले. गेल्या 32 वर्षामध्ये विद्यापीठाने केलेली प्रगती लक्षणीय आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप दिल्या जातात. काही स्कॉलरशिप देणग्यांद्वारे चालवल्या जातात. या सर्वांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Table of contents [Show]
- अमरावती विद्यापीठातून विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप
- श्री शंकरराव गोविंदराव जोग आणि श्रीमती पार्वतीबाई शंकरराव जोग शिष्यवृत्ती
- दिवंगत दिलीप बी. शिंगोरे शिष्यवृत्ती
- दिवंगत डॉ. एम.एन. काळे स्मारक संशोधन शिष्यवृत्ती
- वीर उत्तमराव मोहिते शिष्यवृत्ती
- श्री संत गुलाबराव महाराज आर्थिक मदत
- श्री त्र्यंबक गणपतराव कवळकर संशोधन शिष्यवृत्ती
- रामप्रकाश श्यामलालजी राठी स्मृति शिष्यवृत्ती
- विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती
- अर्ज कसा करावा?
अमरावती विद्यापीठातून विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप दिल्या जातात. त्यापैकी काही स्कॉलरशिप योजना पुढे दिल्या आहेत. त्याबाबत माहिती जाणून घेऊया. या योजनेची पात्रता तुम्ही महाविद्यालयात विचारू शकता.
ही शिष्यवृत्ती B.Sc. I, II आणि III च्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या तिन्ही वर्षातील विद्यार्थ्यांना दरवर्षी 500 रुपये प्रति विद्यार्थी अशी रक्कम दिली जाते. भौतिकशास्त्र हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
दिवंगत दिलीप बी. शिंगोरे शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती बी.ई. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. यात 1500 रुपये वार्षिक अशी रक्कम दिली जाते.
दिवंगत डॉ. एम.एन. काळे स्मारक संशोधन शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती विद्यापीठातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या शिष्यवृत्ती 2 वर्षासाठी असते. याची वार्षिक रक्कम प्रति विद्यार्थी 10,000 रुपये इतकी असते.
वीर उत्तमराव मोहिते शिष्यवृत्ती
पीएच.डी. संशोधनासाठी संशोधकाने संतांचे विचार, जीवन आणि साहित्य आणि गुलाबराव महाराज यांचे साहित्य हा विषय घेतल्यास ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमध्ये 2 वर्षांसाठी प्रति वर्ष 6000 रुपये दिले जाते.
ही शिष्यवृत्ती M.Sc मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दिली जाते. त्याचबरोबर इकॉनॉमिकली बॅकवर्डला प्राधान्य दिले जाते. ही शिष्यवृत्ती 2 वर्षासाठी असते. यात प्रति वर्ष 25,000 रुपये रक्कम दिली जाते.
रामप्रकाश श्यामलालजी राठी स्मृति शिष्यवृत्ती
विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशित असावा. त्याने बारावी किंवा पदवीमध्ये 50% च्या वर गुण मिळवले असावे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सास्कृतिक व क्रिडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्तः करणारे विद्यार्थी सुध्दा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका मान्यता प्राप्त विद्यापीठ व मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची असावी. शिष्यवृत्ती करीता अर्जदाराच्या पालकाचे सर्व बाजुने मिळणारे उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
अर्ज कसा करावा?
वरील सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची माहिती महाविद्ययालयामार्फत पुरवली जाते. या सर्व योजनांसाठी ऑफलाइन अर्ज सादर करावा लागतो. महाविद्यालयातील सुचना फलकावर या सर्व स्कॉलरशिप योजनांबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया व लागणारे कागदपत्रे दिलेली असतात.