• 02 Oct, 2022 09:18

Dogecoin to PKR : काय आहे पाकिस्तानमध्ये डॉजकॉईनची किंमत?

dogecoint to pkr dogecoin in pakistan dogecoin rates in pakistan cryptocurrency in pakistan pakistan crypto update 2022

Dogecoin to PKR : सोमवारी दि. 13 जून, 2022 रोजी डॉजकॉईन (Dogecoin -DOGE) क्रिप्टोकरन्सीची पाकिस्तानी रुपीचा दर (Dogecoin rates in Pakistan) 11.52 पाकिस्तानी रुपी आहे.

Pakistan crypto update 2022 : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून बिटकॉईनकडे पाहिले जात होते. पण बिटकॉईनसोबतच आता डॉजकॉईन लोकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. डॉजकॉईन ही लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या डॉजकॉईनने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. परिणामी या डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि. 11 जून रोजी) एका डॉजकॉईनची किंमत 15.14 पाकिस्तानी रूपी (Dogecoin rates in Pakistan) एवढी होती. भारतीय चलनात याची किंमत सांगायचं झालं तर एक पाकिस्तानी रूपी म्हणजे 38 पैसे. एका डॉजकॉईनची किंमत 15.14 पाकिस्तानी रूपीवरून आज सोमवारी दि. 13 जून रोजी 11.52 पाकिस्तानी रूपी एवढी खाली आहे. यात साधारण 15.11 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

डॉजकॉईनची पाकिस्तानी रूपीमध्ये किंमत

तुम्ही DOGE ते PKR  एका डॉजकॉईनची  किंवा क्रिप्टोकरन्सीची किंमत  (Cryptocurrency in Pakistan ) पाकिस्तानी रूपीमध्ये किती होऊ शकते. हे या संकेतस्थळावर पाहू शकता. आज (दि. 13 जून) एका डॉजकॉईनची किंमत 11.52 पाकिस्तानी रूपी आहे. 1 DOGE Dogecoin = 11.52 PKR

2022 हे वर्ष सुरू झाल्यापासून बिटकॉईनसह जगभरातील सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण होत आहे. काही मोजक्या क्रिप्टोकरन्सी वगळता, बहुतेक क्रिप्टोकरन्सींच्या किमती खाली आल्या आहेत. शनिवारी (दि. 11 जून रोजी) डॉजकॉईनची किंमत 4.28 टक्क्यांनी घसरली. त्याचे मूल्य 0.28 रुपयांनी घसरून 6.23 रुपये झाले. डॉजकॉइन क्रिप्टोकरन्सीचे मार्केटमधील भांडवल 789.9 अब्ज रुपये आहे. येत्या काळात Dogecoin च्या किमतीत मोठी वाढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डॉजकॉईन म्हणजे काय? What is Dogecoin?

डॉजकॉईन (Dogecoin - DOGE) हा इंटरनेट मेमवर आधारित आहे आणि त्याच्या लोगोवर शिबू इनूचे (Shiba Inu) चित्र आहे. पोर्टलँड आणि ओरेगॉनच्या बिली मार्कस आणि सिडनीच्या जॅक्सन पामर यांनी हे मुक्त स्त्रोत असलेले डिजिटल चलन (Free Access Digital Currency ) तयार केले आहे. डॉजकॉईनच्या निर्मात्यांनी गंमतीशीर कल्पनेचा विस्तार करत असताना डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीची निर्मिती केली होती; जी डॉज मेमवर आधारित होती.

DodgeCoin Meme

डॉजकॉईन खरेदी करण्याची प्रक्रिया

डॉजकॉइन हा डॉजकॉइन बास्केटमधून मिळवता येऊ शकतो. Dogefaucet ही एक वेबसाईट आहे. जिथे तुम्हाला डॉजकॉईन चलनाबाबतची अधिक माहिती मिळू शकते. काही प्रमाणात इथे डॉजकॉइन विनामूल्य मिळू शकतात. या फ्री कॉईनद्वारे तुम्ही डॉजकॉइन समुदायांतील लोकांशी देवाण-घेवाण करू शकता. डिजिटल चलन ऑफर करणार्‍या कोणत्याही एक्सचेंजवर DogeCoin खरेदी किंवा विक्री करू शकता येतो. तसेच तो एक्सचेंजवर किंवा DogeCoin वॉलेटमध्ये साठवता येतो.

2025 पर्यंत DogeCoin चं मूल्य एक डॉलरपेक्षा जास्त

क्रिप्टोकरन्सीमधील तज्ज्ञांच्या एका पॅनेलने 2022 वर्षाच्या अखेरीस तसेच 2025 आणि 2030 मध्ये डॉजकॉइनच्या संभाव्य किमतींचा अंदाज शेअर केला आहे. या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2025 पर्यंत त्याची एका डॉजकॉईनची किंमत 1.21 डॉलर होऊ शकते. भारतीय रूपयांत सांगायचे झाले तर एका डॉजकॉईनची किंमत 90.75 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तर 2030 पर्यंत, त्याचा दर 3.60 डॉलर म्हणजेच 270 रुपयांपर्यंत दर पोहोचू शकतो.