अनेक दिवसांच्या नात्यावर आज अखेर पडदा पडला. अजय आणि सुरेखाने सरते शेवटी Divorce चा निर्णय जाहीर केला. कुटुंबीयांसाठी हे काही अगदी अनपेक्षित नव्हते. दोघांमध्येही गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या ठिणग्या सुरूच होत्या. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं इतकंच.
कुटुंबीयांना आपला निर्णय ऐकवल्यानंतर अजय एकटाच बाल्कनीत जाऊन बसला. त्याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना असलेला त्याचा अनेक वर्षांपासूनचा फॅमिली फ्रेंड राकेशही त्याच्या मागोमाग तिथे गेला. अजयशी वेगळ्या विषयावर गप्पा मारून त्याचे मन रमवावे असे राजेशच्या मनात आले पण क्षणमात्रच. त्यानंतर त्याने विचार केला की, आता अजयचा निर्णय पक्का झालाच आहे तर ताकाला जावून भांडं लपवण्यापेक्षा त्याला पुढच्या गोष्टींची कल्पना दिलेली बरी. अजयने घेतलेला निर्णय त्रासदायक जरी होता तरी त्याला असा निर्णय घ्यावा लागेल याची पूर्वकल्पना होतीच त्यामुळे अजयचीही बोलायची तयारी दिसली. तेंव्हा राजेशने या सर्व गोष्टींकडे आता व्यवहारिक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करायचा सल्ला अजयला दिला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने आर्थिक स्तरावर कुठली काळजी घेतली पाहिजे हे समजावून सांगितले.
Divorce प्रक्रियेदरम्यान बऱ्याचदा एका जोडीदाराकडून दुसऱ्या जोडीदाराकडे विशेषतः पत्नीकडून पतीकडे कायद्याच्या आधारे आर्थिक स्तरावर मोठी मागणी केली जाते. एका अर्थी ते योग्यच असले तरी काही वेळा एका जोडीदाराच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा निर्णयामुळे दुसऱ्या जोडीदाराला मोठा आर्थिक मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी आपल्या संपत्तीवर आवाजवी हक्क सांगितला जाऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया.
Table of contents [Show]
Family Trust (फॅमिली ट्रस्ट)
Divorce सारखा निर्णय झाल्यावर आपली फॅमिली ट्रस्ट ओपन करून आपली सगळी Asset (स्थावर मालमत्ता) त्यावर ट्रान्सफर करावी. असे केल्याने कुठल्या एका जोडीदाराकडे जास्तीचा भाग न जाता दोघांमध्ये समसमान वाटणी तसेच मुलांच्या भविष्याचा विचार करून योग्य आर्थिक योजना अवलंबिल्या जातात.
नॉमिनी बदलणे
ज्या ज्या इन्व्हेस्टमेंटला (गुंतवणूक योजना) नॉमिनी (वारसदार) म्हणून spouce add आहे तिथून त्याला exclude ( वगळणे ) करून घेणे.
Joint अकाऊंट individual करणे
दोघही जणांचे Jointअकाउंट असल्यास त्याला Individual अकाउंट मध्ये कन्व्हर्ट करणे .
टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जोडीदाराला नॉमिनी केलेले असल्यास ते कॅन्सल करून नवीन टर्म इन्शुरन्स करून घेणे.
Divorce ची संपूर्ण प्रक्रिया हि त्या दोन्ही व्यक्तींसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठीही त्रासदायक असते. मात्र अशावेळी व्यवहारिकदृष्ट्या काही गोष्टींचा योग्य विचार करून , योग्य सल्ल्याने योग्य उपाययोजना अवलंबिल्यास आपला त्रास काही प्रमाणात कमी होवू शकतो.