ITR Filing Last Date: 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR Filing) भरण्याची अंतिम तारीख (ITR Filing Last Date) 31 जुलै 2023 आहे. भारतात फार कमी लोक आयकराच्या कक्षेत येतात. त्यामुळेच देशात आयटीआर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही ते देखील ITR दाखल करू शकतात. विवरणपत्र भरण्यात कोणतीही हानी नाही. आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, त्यांच्याविषयी माहिती नसल्याने लोक हे आयटीआर भरण्यास चालढकल करतात.
Table of contents [Show]
जलद कर्ज मिळण्यास उपयुक्त
आयटीआर हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्था ITR उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारतात. जर तुम्ही ITR भरत असाल आणि भविष्यात तुम्ही कार लोन किंवा होम लोनसह कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा तुम्हाला जलद कर्ज मिळेल.
TDS परत मिळतो
तुमचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नसले तरीही, काही कारणास्तव TDS कापला जातो. अशा वेळी, जेव्हा तुम्ही RTR दाखल करता तेव्हाच तुम्हाला परतावा मिळेल. आयटीआर दाखल केल्यानंतरच तुम्ही कर भरण्यास जबाबदार आहात की नाही याचे आयकर विभाग मूल्यांकन करते.
व्हिसा मिळविण्यास फायदेशीर
जर तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल, तर तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाऊ शकते. अनेक देश व्हिसा देताना लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा मागतात. आयटीआर पावत्या तुमच्या उत्पन्नाचा भक्कम पुरावा आहेत. आयटीआर इतर देशातील अधिकाऱ्यांना आश्वासन देते की, तुम्ही तुमच्या प्रवासाचा खर्च भागवण्यास सक्षम आहात.
विमा घेतांना गरजेचे
आता विमा कंपन्यांनी मोठ्या मुदतीच्या योजना (Long term plans) घेणाऱ्यांकडून त्यांच्या आयटीआर पावत्या मागायला सुरुवात केली आहे. विमाधारकाच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्याची नियमितता तपासण्यासाठी ते फक्त ITR मागतात.
इतर फायदे
ज्यांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठीही आयटीआर खूप उपयुक्त आहे, जे नुकसान भरून काढण्यास मदत करतात . यामध्ये नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षापर्यंत पुढे नेणे आणि आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास तोटा नफ्याशी समायोजित केला जाईल आणि तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल.