Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Rule Change : RBI ने मुदत ठेवींचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला ठाऊक आहेत का? 

Fixed Deposit

FD Rule Change : 1 जानेवारीपासून मुदत ठेवींचे काही नियम रिझर्व्ह बँकेनं बदलले आहेत. मुदत संपल्यावरही मुदत ठेव काढून घेतली नाहीत, तर त्यावर व्याज द्यायला आता बँक बांधील नसेल.

कोरोनाच्या उद्रेकानंतर (Coronavirus Pandemic) उद्भवलेल्या महागाईला तोंड देण्यासाठी जगभरातल्या मध्यवर्ती बँकांनी (Central Bank) दरवाढीचं धोरण स्वीकारलं. आणि त्यामुळे कर्जं जरी महाग झाली असली तरी तुमच्या मुदत ठेवींवरचा व्याजदरही वाढला. त्यामुळे मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit) गुंतवणुकीचा लोकांचा कल अलीकडे वाढला आहे. अशा लोकांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे.     

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) बँकांसाठी आणलेल्या नवीन नियमांनुसार, आता मुदत ठेवींची मुदत संपली तर त्यावर व्याज द्यायला बँका बांधील नसतील. 1 जानेवारीपासून हा नवा नियम लागूही झालाय. मुदत ठेव ही विशिष्ट कालावधीसाठी असते. आणि ठरावीक कालावधी संपला की तुम्हाला पूर्वनिर्धारित व्याज दराने पैसे मिळतात. पण, काही कारणांनी तुम्ही मुदत ठेवेची (FD) मुदत संपल्यावरही ती मोडली नाहीत. म्हणजे गुंतवणूक चालूच ठेवलीत तर बँका स्वत:हून अशा मुदत ठेवींचं नूतनीकरण करत असत.     

म्हणजे तुमची मुदत ठेव बँकेत आधीचीच मुदत आणि व्याजदरावर सुरू राहत असे. आता बँकांना स्वत:हून असं नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही पैसे काढले नाहीत, तर तुमचे पैसे बँकेत तसेच पडून राहतील.     

अशा ठेवींवर आता मुदत ठेवीचा नाही तर बचत खात्याचा व्याजदर मिळत राहील. सध्या सर्वसाधारणपणे बँका 5 ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 5% च्या वर व्याजदराने पैसे देतात. तोच बचत खात्यावरील व्याजदर 3 ते 4% इतकाच आहे.     

रिझर्व्ह बँकेचा नवीन नियम असं सांगतो की, मुदत ठेवेची मुदत संपल्यावर किती व्याजदर आकारायचा हे बँकेनं आधी ठरवलं असेल तर तो दर आणि बँक देऊ करत असलेला बचत खात्यावरील व्याजदर यातला जो दर कमी असेल त्या दराने अशा मुदत ठेवींवर व्याज मिळेल.