ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर बँक जास्त व्याजदर देते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, सुपर सिनियस सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) साठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा 0.50 ते 0.25 बेसिस पाँइंट अधिक व्याजदार काही बँकाकडून देण्यात येतो. 60 वर्षांवरील व्यक्ती सिनियर सिटिझन गटात मोडते तर 80 वर्षांवरील व्यक्ती सुपर सिनियर सिटिझन गटात मोडते.
आरबीएल बँक सुपर सिनियर सिटिझन मुदत ठेव
60 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अतिरिक्त 0.50 % व्याजदर मिळेल. तर 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अधिकचा व्याजदर मिळेल. मुदत ठेवीचा कार्यकाळ कितीही असला तरी हा अतिरिक्त व्याजदर मिळेल. सध्या आरबीएल बँक सुपर सनियर सिटिझनच्या मुदत ठेवींवर 8.3 टक्के व्याजदर देते. हा दर 25 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाला आहे.
युनियन बँक सुपर सिटीझन मुदत ठेव दर
युनियन बँक सुद्धा सिनियर सिटीझनला 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर देते. तर सुपर सिनियर सिटिझनला 0.75 टक्के अतिरिक्त वार्षिक व्याजदर देते. सुपर सिनियरसाठीचे अतिरिक्त व्याजदर हे 1 डिसेंबर 2022 पासून सुरू केलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवींवर मिळेल.
PNB बँक सुपर सिनियर मुदत ठेव दर
पीएनबी बँकेच्या नियमानुसार 60 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांच्या 5 वर्षापर्यंच्या मुदत ठेवींवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याजदर मिळेल. तर पाच वर्षापुढील सुपर सिनियर सिटिझनच्या मुदत ठेवींवर 80 बीएसपी अतिरिक्त व्याजदर मिळेल. पीएनबी बँकेकडून सुपर सिनियर सिटिझनला 8.10 टक्के व्याजदर मुदत ठेवींवर दिला जातो.
इंडियन बँक सुपर सिनियर सिटिझन मुदत ठेव
इंडियन बँकेद्वारे 'गोल्डन एजर' अशी विशेष मुदत ठेव योजना सुपर सिनियर सिटिझनसाठी राबवली जाते. याद्वारे सुपर सिनियर सिटिझनला अतिरिक्त व्याजदरावरही अजून 0.25 टक्के व्याजदर दिला जातो. सर्व मुदत ठेवींसाठी ही योजना लागू आहे.