Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Favourite Stocks of Fund Managers : 2022 मध्ये म्युच्युअल फंड मॅनेजरनी या मिडकॅप शेअरमध्ये गुंतवले पैसे  

Mutual Fund

Favourite Stocks of Fund Managers : म्युच्युअल फंड कंपन्या कुठल्या शेअरमध्ये पैसे गुंतवतायत ते पाहून सामान्य गुंतवणुकदारांनाही दिशा मिळत असते. आघाडीच्या फंड मॅनेजरनी गेल्यावर्षी केलेली गुंतवणूक आणि त्यासाठी निवडलेले शेअर यावर एक नजर टाकूया

निफ्टी (Nifty) निर्देशांकाच्या मिडकॅप इन्डेक्समध्ये (Midcap Index 150) मिडकॅप क्षेत्रातले 150 शेअर आहेत. आणि 2022 मध्ये यातल्या जवळ जवळ 66 शेअरनी चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिलाय. आणि या शेअरच्या कामगिरीमुळे वर्षभरात मिडकॅप 150 निर्देशांकही 4% च्यावर वाढला आहे.     

ACEMF संस्थेनं अशा काही मिडकॅप शेअरचा डेटा एकत्र केला आहे ज्यांनी 2022 मध्ये चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. आणि म्युच्युअल फंड मॅनेजरनी (Mutual Fund Manager) या शेअरमधली गुंतवणूक 2023 मध्येही कायम ठेवली आहे. असे निवडक पाच शेअर बघूया.     

वरुण बेव्हरेजेस   

2022 मधला परतावा - 124%   

किती म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आहे - 59   

कोणते म्युच्युअल फंड - टाटा लार्ज अँड मिडकॅप, निप्पॉन इंडिया ग्रोथ, सुंदरम कन्झम्पशन फंड     

युनिअन बँक ऑफ इंडिया    

2022 मधला परतावा - 85%    

किती म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आहे - 21   

कोणते म्युच्युअल फंड - क्वांट मिडकॅप, टॉरस डिस्कव्हरी, टाटा क्वांट फंड    

सोलार इंडस्ट्रीज इंडिया    

2022 मधला परतावा - 82%    

किती म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आहे - 36   

कोणते म्युच्युअल फंड - कोटक इन्फ्रा अँड इको रिफॉर्म, एसबीआय फोकस्ड इक्विटी, श्रीराम लाँगटर्म इक्विटी फंड     

द इंडियन हॉटेल्स कंपनी    

2022 मधला परतावा - 76%    

किती म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आहे - 110   

कोणते म्युच्युअल फंड - क्वांट ESC इक्विटी, HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटी, HSBC ELSS फंड    

TVS मोटार कंपनी    

2022 मधला परतावा - 73%    

किती म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आहे - 97   

कोणते म्युच्युअल फंड - टाटा क्वांट, ICICI प्रू फ्लेक्झीकॅप, SBI मल्टीकॅप