Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake IT Notice: आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी तर नाही? असे घ्या जाणून

Fake IT Notice

Image Source : https://www.freepik.com/

मोठमोठे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सराफा व्यापाऱ्यांवर बेहिशेबी मालत्ता, करचोरी, फसवणूक अशा विविध कारणांमुळे आयकर विभागांकडून कारवाई केली जाते. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे.

मोठमोठे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सराफा व्यापाऱ्यांवर बेहिशेबी मालत्ता, करचोरी, फसवणूक अशा विविध कारणांमुळे आयकर विभागांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे अनेकांना आयकर विभागांकडून कारवाई होण्याची भिती वाटते. आता याचाच फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. स्कॅमर्सकडून आयकर विभागाचे नाव वापरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. स्कॅमर्सकडून विभागाचे नाव वापरून बनावट नोटीस पाठवली जाते. मात्र, आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी आहे की खरी? हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक

सायबर गुन्हेगारांकडून आयकर विभागाच्या नावाखाली नागरिकांना बनावट नोटीस पाठवली जात आहे. प्रामुख्याने ईमेलच्या माध्यमातून ही नोटीस पाठवली जाते. यामध्ये आयकर विभागाच्या ईमेल आयडी, वेबसाइट सारख्या साम्य असलेल्या बनावट ईमेल आयडीचा वापर केला जातो. या नोटीसमध्ये पैशांची मागणी देखील केली जाते. नागरिकांना नोटीसची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.

केवळ अधिकृत ईमेलवरूनच पाठवली जाते नोटीस

आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेली प्रत्येक नोटीस ही कॉम्प्युटर जनरेटेड असते. प्रत्येक नोटीसवर डीआयएन नंबर (Document Identification Number) असतो. डीआयएन नंबरमुळे नोटीसची सत्यता तपासण्यास मदत होत असते.

तसेच, नोटीस ही सर्वसाधारणपणे ईमेलच्या माध्यमातूनच पाठवली जाते. यासाठी विभागाच्या अधिकृत ईमेल आयडीचाच वापर केला जातो. अधिकाऱ्यांद्वारे नोटीस पाठवलेली असल्यास त्यांच्या नावाचा व पदाचा ईमेल आयडीमध्ये उल्लेख असतो. याशिवाय, एसएमएसच्या माध्यमातूनही नोटीसची माहिती दिली जाते.

अधिकृत ईमेलमध्ये @incometax.gov.in या डोमेनचा उल्लेख केला जातो. याशिवाय, प्रत्येक नोटीसची माहिती आयकर विभागाच्या वेबसाइटवर असते. नोटीस खरी आहे की नाही, हे तुम्ही या वेबसाइटवरून तपासू शकता. आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये पैशांच्या मागणीचा कोणताही उल्लेख नसतो. तसेच, यात पैशांची मागणी करणारी कोणती लिंक नसते. त्यामुळे अशाप्रकारची नोटीस आल्यास त्याबाबतची संपूर्ण सत्यता जाणून घेणे गरजेचे आहे.

पोर्टलवर तपासा नोटीसची सत्यता

  • आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसची पडताळणी करण्यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर जावे लागेल.
  • त्यानंतर 'Authenticate notice/order issued by ITD' या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला पॅन अथवा डीआयएन नंबर टाकून नोटीसची सत्यता तपासता येईल.
  • पॅन अथवा डीआयएन नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर नोटीसबाबत माहिती मिळेल. नोटीस खोटी असल्यास डीआयएन नंबर चुकीचा असल्याची माहिती स्क्रिनवर दिसेल.