चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2022 मध्ये देशाची निर्यात 12.2 टक्क्यांनी घसरून 34.48 अब्ज डॉलर झाली. या कालावधीत, आयात कमी होऊनही देशाची व्यापार तूट 12.8 टक्क्यांनी वाढून 23.76 अब्ज डॉलर झाली. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयात 3.5 टक्क्यांनी घसरून 58.24 अब्ज डॉलरवर आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये ती 60.33 अब्ज डॉलर होती.डिसेंबर 2021 मध्ये देशातून 39.27 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आणि सेवांची निर्यात झाली. त्या काळात 21.06 अब्ज डॉलरची व्यापार तूट होती.
गेल्या महिन्यात 34.48 अब्ज डॉलरची निर्यात झाली
डिसेंबरमध्ये अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात जवळपास 12% ने घसरून 9.08 अब्ज डॉलर झाली आहे. हिरे आणि दागिन्यांची निर्यात 15.2% ने घसरून 2.54 अब्ज डॉलर झाली. तसेच, ज्या वस्तूंची निर्यात घटली आहे त्यात कॉफी, काजू, चामड्याच्या वस्तू, औषधी, चटई, हातमाग यांचा समावेश आहे.
एप्रिल-डिसेंबरमध्ये व्यापार तूट 60% वाढू शकते
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत व्यापार तूट 60.45 टक्क्यांनी वाढून 218.94 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच कालावधीत व्यापार तूट 136.45 अब्ज डॉलर होती.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, जगभरातील आर्थिक आव्हाने असूनही देशाची निर्यात स्थिर राहिली आहे. जागतिक मंदीच्या प्रवृत्तीमुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत.