प्रत्येकाला वाटते आपण लवकरात लवकर श्रीमंत व्हावं आणि नोकरीतून निवृत्ती घ्यावी. पण प्रत्येकाच्या नशिबात असे सुख नसते. पण श्रीमंत किंवा करोडपती होण्याचे बरेच मार्ग उपलब्ध आहेत. सध्याच्या काळात गुंतवणुकीचे तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जिथे तुम्ही तुमचा कष्टाचा पैसा गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता.
पण बऱ्याच जणांना असे वाटते की, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे आपण कधीच करोडपती होणार नाही. पण हा विचार एकांगी आणि काही प्रमाणात चुकीचा देखील ठरू शकतो. कारण पैसे गुंतवण्यासाठी ते एकाचवेळी आणि भरपूर असले पाहिजेत असे नाही. गुंतवणूक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात तुम्हा सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर तुम्हीही नक्कीच करोडपती होऊ शकता.
करोडपती होण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कमीतकमी पैशांतून गुंतवणूक कशी सुरू करायची. तर एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करून नक्कीच चांगला परतावा मिळवू शकता. एसआयपी ही गुंतवणुकीची एक सर्वमान्य आणि प्रचलित असलेली गुंतवणूक पद्धत आहे. या पद्धतीने गुंतवणूक केलेल्यांना चांगला फायदा झाला आहे.या सुत्रानुसार काहीजण करोडपतीदेखील झाले असतील. पण तुमच्या मनात प्रश्न आले असतील की, करोडपती होण्यासाठी मला वैयक्तिक किमान किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
तर एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना नक्कीच आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. त्या ध्येयानुसार, प्रत्येक महिन्याला 1000 रुपये, आठवड्याला 5000 रुपयांची एसआयपी पुरेशी होईल का? की प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक करून तुमचे ध्येय पूर्ण होऊ शकते? की एकदम एक मोठी रक्कम भरावी लागेल का, असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. या प्रश्नांनी तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका. तु्म्ही दररोज एसआयपीद्वारे 1000 रुपयांची गुंतवणूक करूनदेखील करोडपती होऊ शकता.
WhiteOak's Study काय सांगतो
एसआयपीएमध्ये दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक स्वरूपात गुंतवणूक केली तरी या तिन्हीमधून मिळणाऱ्या परताव्याचा रेशो हा समानच येतो, हे WhiteOak's Study या अभ्यासामधून दिसून आले आहे. या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, महिन्यातील सर्वांत वाईट दिवसांमध्येही गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 14.1 टक्के परतावा मिळाला. तर चांगल्या दिवसांमध्ये गुंतवणूक केलेल्यांना 14.6 टक्के परतावा मिळाला आणि एसआयपीच्या नियमानुसार एका ठरलेल्या तारखेला गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 14.3 टक्के परतावा मिळाला. एसआयपीच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक केलेल्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर एसआयपी सुरू करावी आणि ती दीर्घकाळासाठी सुरू ठेवावी. असे बऱ्याचदा अर्थ सल्लागारांकडून सांगितले जाते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) या संस्थेनुसार, एसआयपी हा गुंतवणुकीचा साधासोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे. याचा खूप विचार न करता एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक केल्याने निश्चित फायदा होऊ शकतो.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)