Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ईएसजी निकषाने गुंतवणूक: 'ESG' ट्रेंडची होतेय चर्चा, काय आहे कारण ?

ESG Theme

ESG Based Investment : आजघडीला संपूर्ण जगात ईएसजी विषयक निकष ही महत्वाची मानकं बनत आहेत. गुंतवणूक आदीबाबत ईएसजी निकषांचा विचार प्राधान्याने केला जाऊ लागला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामकाज पद्धतीवर त्याचा अनुकूल प्रभाव पडताना दिसतो.

अलीकडच्या काळात व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात ईएसजी (ESG) निकषांची चर्चा वाढली आहे. कंपन्यांच्या आणि व्यवसाय क्षेत्रांच्या कारभारात ईएसजीचा उल्लेख होऊ लागला आहे. इतकंच नव्हे तर गुंतवणुकीच्या (Investment) काही योजना (Scheme) खास ईएसजीला केंद्रित ठेवून तयार करण्यात येत आहेत. ईएसजी आधारित म्युच्युअल फंड योजना अलिकडच्या काळात प्रकाशझोतात आल्या आहेत. अशावेळी ईएसजी सेक्टर म्हणजे काय याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. ईएसजी ही तीन आद्याक्षरे आहेत. एनव्हायर्न्मेंटल (Environment), सोशल (Social) आणि गव्हर्नन्स (Governance) या तीन शब्दांनी मिळून ईएसजी ही आद्याक्षरे तयार होतात.

ईएसजी निकषांचा विचार होण्यापूर्वी व्यवसायांचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार व्हायला सुरुवात झाली होती. ग्रीन किंवा हरित उत्पादने ( Green Product's) सेवा (Service) आणि कार्यपद्धती (System) यांचा विचार सुरू झाला होता. त्याच दरम्यान असेही लक्षात येत होतं की, केवळ पर्यावरणाचा विचार करून चालणार नाही. पर्यावरणासोबतच सभोवतीच्या लोकांचा आणि व्यवस्थापन अर्थात गव्हर्नन्सचा विचार एकत्रितरित्या करावा लागेल. त्यातूनच पुढे ईएसजी या व्यापक संकल्पनेचा प्रसार व प्रचार होत गेला. 

पर्यावरणविषयक निकष केंद्रस्थानी (Environment)

आजघडीला संपूर्ण जगात ईएसजी विषयक निकष ही महत्वाची मानकं बनत आहेत. गुंतवणूक आदीबाबत ईएसजी निकषांचा विचार प्राधान्याने केला जाऊ लागला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामकाज पद्धतीवर त्याचा अनुकूल प्रभाव पडताना दिसतो. यात पहिला घटक आहे तो एनव्हायरन्मेंटल अर्थात पर्यावरणविषयक निकष. पर्यावरणाचा दृष्टीकोन एकूण कारभारात कसा आहे किंवा त्याविषयी काय विचार झाला आहे, कृती झाली आहे या बाबी या निकषांतून स्पष्ट होतात. उदाहरणार्थ - कंपन्या आपली उत्पादने प्रदूषणमुक्त पद्धतीने करतात का, ग्रीनहाऊस (Green House) वायूचे उत्सर्जन आदीची काळजी घेतात का, उत्पादने आणि सेवा पर्यावरणपूरक असतात करतात का अशा स्वरुपाची माहिती (Information) व डेटा (Data) हा या पर्यावरणीय निकषांत अंतर्भूत होतो.

सोशलमध्ये व्यापक मानवी आणि सामाजिक हिताला प्राधान्य (Social) 

सोशल (Social) अर्थात सामाजिक दृष्टीने कंपन्यांच्या कारभाराचाही विचार केला जातो. कंपन्या आपल्याशी संबंधित मनुष्यबळ (Human Capital) किंवा माणसांबाबत काय दृष्टीकोन बाळगून आहेत, मानवी मुल्यांच्या दृष्टीने काळजी घेतली जाते का, वस्तू आणि सेवा यांच्या निर्मिती प्रक्रियेचा आसपासच्या समाजावर कसा प्रभाव पडतो, अशा व्यापक मानवी आणि सामाजिक हिताचे निकष या घटकामध्ये अभ्यासले जातात.

गव्हर्नन्स, समाजावर प्रभाव टाकू शकणारी मोठी ताकद (Governance)

तिसरा घटक आहे जी अर्थात गव्हर्नन्स. व्यवस्थापन आणि गव्हर्नन्स ही केवळ कंपनीपुरतीच नव्हे तर समाजावर प्रभाव टाकू शकणारी मोठी ताकद आहे. व्यवस्थापनाचा (Management) कारभाराचा एकूण विचार आणि कृती कशी आहे, याचा अभ्यास या गव्हर्नन्सच्या विषयात येतो. जगातील अनेक भागात आर्थिक प्रगती झाली. मात्र ज्या पद्धती वापरून आपण आर्थिक उद्दीष्टे साधली गेली त्यातून
पर्यावरण आणि मानवी समुदायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पुढे येत आहे. 

वसुंधरा अधिक स्वच्छ आणि अधिक राहण्यायोग्य ठेवायची असेल तर वरील तीनही बाबींचा अधिकाधिक विचार करणारी उत्पादने आणि सेवांचा विकास व्हायला हवा त्याचप्रमाणे एकूण व्यवस्थापकीय दृष्टीकोनही त्याला अनुकूल असा तयार व्हायला हवा. जर गुंतवणूक ईएसजी निकष लक्षात घेऊन होऊ लागली तर आपोआपच अधिक स्वच्छ अधिक हरित आणि सभोवतीच्या समाजाला स्वास्थ्यहानी न पोचवणारी उत्पादने सेवा आणि त्यांची कार्यपद्धती तयार होऊ लागेल. ईएसजी निकषांवरील गुंतवणुकीमागे हा विचार जगात प्रबळ होत आहे.