Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk's Recap Report: 2022 वर्षात एलॉन मस्क यांचे नेटवर्थ दोन वर्षे खाली गेले!

Elon Musk's wealth has dropped by 45 percent this year

In the year 2022, Elon Musk's net worth went down for two years: टेल्सा कंपनीचे मालक, ट्विटरचे नवे सीईओ एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. यंदाच्या वर्षात नेमकी किती घट झाली ते या बातमीतून समजू घ्या.

Elon Musk's wealth has dropped by 45 percent this year: जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ट्विटरचे नवे सीईओ एलॉन मस्क हे आता जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत, असे ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांक अहवालात नमूद केले आहे. सध्या मस्क यांची एकूण संपत्ती १४८ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांची ही संपत्ती दोन वर्षाच्या निच्चांकी पातळीवर गेली असल्याचे ब्लुमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

debit-credit-2022-12.png

यंदा संपत्तीत किती अब्ज डॉलरची घट? How many billions of dollars were lost?

एलन मस्क यांची संपत्ती या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी 271 अब्ज डॉलर ( 22.42 लाख कोटी) होती. ही संपत्ती आता 148 अब्ज डॉलरवर आली आहे. म्हणजेच,या वर्षी एकट्या मस्क यांच्या संपत्तीत 123 अब्ज डॉलरची (45.4 टक्के) घट झाली आहे.

टेस्लाचा शेअरमध्ये मोठी घसरण (Tesla's share fell sharply)

या वर्षाच्या सुरुवातीस टेस्लाच्या शेअरची किंमत 400 डाॅलरच्या जवळ होती. आता शेअर्सचा भाव 262.13 डॉलर किंवा 65.54 टक्क्याने घसरून 137.80 डॉलरवर आला आहे. मागील सहा महिन्यांत शेअर्स 41 टक्के पडला आहे.
डिसेंबर महिन्यात टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी स्टॉक प्रति शेअर 194.70 डॉलरवर बंद झाला होता. अर्थात, 30 नोव्हेंबरपासून सातत्याने शेअरच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात 29.22 टक्क्यांनी म्हणजे 56.9 डॉलरची घसरण पाहायला मिळाली आहे. टेस्ला कंपनीच्या शेअरमधली ही विक्रमी घसरण आहे, असे तज्ज्ञ म्हणतात. ट्विटरचा अधिकृत करार पार पडल्यावर चोवीस तासांमध्ये मस्क यांचे 7.7 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. संपत्तीत 65 हजार कोटी रुपयांची घट झाली.

एलॉन मस्क 2022 वर्षात जितके चर्चेत राहिले, तितकीच त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. त्यांचे व्यवसायिक नुकसान झाले आहे.