People are curious about what Elon Musk eats: एलॉन मस्क नेमके काय खातो?, एलॉन मस्क फूड असे वर्षभरात जगभरातील नागरिकांनी दिवसाला साधारण 350 वेळा गुगलवर सर्च केले आहे. तर झोमाटो इंडियाच्या अहवालानुसार भारतातील झोमाटोच्या ग्राहकांनी झोमाटो अॅपवर तब्बल 724 वेळा एलॉन मस्क फूड असे सर्च केले आहे.
एलॉन मस्कबाबत सर्वाधिक सर्च झालेले प्रश्न (Most searched questions about Elon Musk)-
जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेले एलॉन मस्क, ज्यांनी 2022 वर्ष गाजवले. विविध कारणांसाठी ते सातत्यांने चर्चेत, बातम्यांमध्ये राहिले. या चर्चांमुळे मस्क हे 2022 वर्षातले सर्वाधिक गुगल सर्च झालेले सातवे व्यक्ती ठरले आहेत. तब्बल 3.19 मिलियन जनतेने मस्क यांना सर्च केले आहे. एलॉन मस्क कोण आहेत? एलॉन मस्क यांचे नेटवर्थ किती? एलॉन मस्क'स इनव्हेंशन, हाव एलॉन मस्क मेक्स सक्सेसफूल यासह एलॉन मस्क फूड, एलॉन मस्क डाएट प्लॅन आदी प्रश्न जनतेने सर्च केले होते. साधारण दिवसाला 350 वेळा एलॉन मस्क यांच्या जेवणाविषयी सर्च करण्यात आले. तर, दुसरीकडे नुकतेच झोमाटो इंडियाने आपला वार्षिक अहवाल सादर केला, त्यात त्यांनी अॅपवर सर्वाधिक गंमतीशीर सर्च केलेल्या गोष्टींची माहितीदेखील दिली आहे. यात एलॉन मस्क फूड असे 724 भारतीयांनी सर्च केल्याचे दिसून येत आहे.
एलॉन मस्कच्या जेवणाची चर्चा सुरू कशी झाली? (How did Elon Musk's food talk start?)-
एलॉन मस्क यांनी 9 किलो वजन कमी केल्यानंतर, एका इव्हेंटसाठी ग्रीस येथे गेले होते. त्यावेळी इव्हेंटचे फोटो, व्हिडीओ पाहून सोशल मिडियावर त्यांच्या वजनाची चर्चा सुरू झाली, ऐवढेच नाही तर त्यांच्या वजनावरुन काही पेपरनी हेडलाईन्स देखील केल्या. इतक्या चर्चा होत असताना पाहून, एलॉन मस्क यांनी त्यांच्या वेटलॉसची जर्नी सांगितली होती. जेणेकरून इतरांना वेटलॉस करण्यासाठी मदत होईल, त्यांना प्रेरणा मिळेल. याविषयी सांगताना त्यांनी टेस्टी फूडपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. टेस्टी फुडमुळे वजन वाढते असे ते म्हणाले होते. यानंतरच एलॉन मस्क'स फूड, एलॉन मस्क'स डाएट प्लॅन, एलॉन मस्क'स सिक्रेट डाएट प्लॅन आदी प्रश्न सर्च व्हायला सुरुवात झाली.
एलॉन मस्क यांचे डाएट काय? (What is Elon Musk's diet?)-
काही अमेरिकी वेबासईट्सने मस्क यांच्या संपूर्ण डाएटची माहिती दिली आहे. यावर भारतातल्या वृत्त वेबसाईट्सनेही बातम्या केल्या आहेत. याचाच अर्थ एलॉन मस्क यांच्या व्यवसायिक बातम्यांसह त्यांचे जेवण, घर, लूक्स यांचीही चर्चा अधिक होतहोती. मस्क हे इंटरमिटेंट फास्टिंग करतात. ज्यामुळे ते सकाळी नाश्ता करत नाहीत. जेवायला ते ग्रील, बार्केक्यू केलेले जेवण जेवतात. रात्री जेवायला ते हलके फुलके पदार्थ खातात. ते मधुमेहग्रस्त असल्यामुळे गोड खात नाहीत, मधुमेहाच्या औषधांसह फिट राहण्यासाठी काही औषधे घेतात. त्यांना डाएट व्यतिरीक्त फ्रेंच फूड, कॉफी, वाईन आणि ऑम्लेट आवडते, ही सर्व माहिती अनेक अमेरिकी वेबसाईटवर उपलब्ध आहे.