पॉलिसी बझारसोबत आता तुम्ही चांगला पैसा कमावू शकता. तब्बल 58 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचं नुकसान झाल्यानंतर आता या कंपनीचा शेअर तेजीसाठी सज्ज झालाय. फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये यासंबंधी सविस्तर वृत्त देण्यात आलंय. कंपनीनं मार्च तिमाहीत आपल्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलीय, असं ब्रोकरेजचं म्हणणे आहे. तिमाहीच्या आधारावर विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ झालीय. एकूणच कंपनीचा तोटा अनेक पटींनी कमी झाल्याचं दिसतंय. मार्चच्या तिमाहीत पीएटी तोटा केवळ 9 कोटी इतकाच राहिला, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 219.6 कोटींचा तोटा झाला होता.
Table of contents [Show]
शेअरची किंमत 980 रुपयांपर्यंत जाऊ शकते
पीबी फिनटेकनं मार्चच्या तिमाहीत जोरदार कामगिरी केली, असं ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्सचं मत आहे. कंपनीची टॉपलाइन वाढ तिमाही तसंच वार्षिक आधारावर 42.5 टक्के आणि 60.9 टक्के आहे. तर महसूल 870 कोटींवर पोहोचलाय. याचं प्रमाणही अधिक आहे. कारण तो अपेक्षेपेक्षा 15.5 टक्के जास्त आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च महिन्याच्या तिमाहीत कंपनीचं मार्जिन 3.2 टक्के होतं. तिमाहीच्या आधारावर 780 अंकांची ग्रोथ झाल्याचं दिसतंय. अॅडजस्टेबर एबिट्डा (EBITDA) प्रॉफिटेबल राहिला. तिमाहीच्या आधारावर विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ झालीय. पीबी पार्टनर्स बिझनेसनं 68 टक्के QoQ वाढ नोंदवली. जीवन विमा पॉलिसींची विक्री चांगली असल्यानं फायदा झालाय.
ब्रोकरेजनं दिला गुंतवणुकीचा सल्ला
पैसा बझारची डिस्बर्सल ग्रोथ तिमाही आधारावर 11 टक्के आहे. एबिट्डादेखील फायदेशीर आहे. नव्या इनिशिएटिव्हनं (PB पार्टनर्स, PB कॉर्पोरेट आणि UAE) त्यांचं नुकसान कमी केलंय. येत्या काही दिवसांत ते फायदेशीर ठरण्याचीही अपेक्षा व्यक्त होतेय. या एकूण कामगिरीनंतर ब्रोकरेजनं स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. 980 रुपयांचं लक्ष्य असणार आहे.
पीबी फिनटेकचा शेअर 2021ला लिस्ट
15 नोव्हेंबर 2021ला पीबी फिनटेकचा शेअर लिस्ट झाला होता. इश्यू प्राइज 980 रुपयांच्या तुलनेत तो चांगल्या प्रिमियमसह 1444 रुपयांना लिस्ट झाला. सध्या हा शेअर 619 रुपयांच्या आसपास आहे. इश्यू प्राइजच्या 37 टक्के तो कमी आहे. तर लिस्टिंग प्राइज 57 टक्के डिस्काउंटवर आहे. स्टॉकसाठी एक वर्षाचा उच्चांक 748 रुपये आहे, तर एका वर्षाचा नीचांक 356 रुपये इतका आहे.
पीबी फिनटेकचा पीएटी तोटा 9 कोटी
मार्चच्या तिमाहीत पीबी फिनटेकचा पीएटी तोटा केवळ 9 कोटी इतकाच राहिला. त्याचप्रमाणे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 219.6 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत वार्षिक आधारावर ऑपरेटिंग महसूल 61 टक्क्यांनी वाढून 869 कोटी रुपये झाला आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीचा विमा प्रीमियम 3586 कोटी आहे आणि त्यात 65 टक्के वाढ झालीय. वार्षिक आधारावर कर्ज वितरण 53 टक्क्यांनी वाढून 3357 कोटी झालंय. ग्रोथ ऑफ रिन्यूबल इन्कम, ग्रोथ ऑफ न्यू बिझनेस आणि हायर एफिशिएन्सी ऑफ न्यू बिझनेसला कंपनीनं ओव्हरऑल ग्रोथचे 3 इंजिन सांगितले आहेत.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)