Droneacharya Aerial Innovations IPO खुला झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत 62.90 लाख ताजे इक्विटी शेअर जारी केले जात आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाविषयी कुतुहल वाढत आहे. त्याची उपयुक्तता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे या आयपीओला कसा प्रतिसाद मिळतो ते बघणे महत्वाचे ठरणार आहे.
ड्रोनाचार्य कंपनीने 13 डिसेंबर रोजी 34 कोटी रुपयांचे आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले केले आहेत. ड्रोन हे भविष्यातील एक महत्वाचे तंत्रज्ञान म्हणून पुढे येत आहे. यामुळे या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची ही एक प्रकारे संधी असल्याचे मानले जात आहे.
15 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करणे शक्य
ड्रोन स्टार्टअप ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स हा पुण्यातील स्टार्टपचा आयपीओ आहे. ३४ कोटी रुपये इतके याचे मूल्य आहे. बुधवारपासून हा आयपीओ खुला झाला आहे. ग्रे मार्केटमधून मिळणाऱ्या संकेतांऐवजी कंपनीच्या मूलभूत आणि आर्थिक बाबींच्या आधारे गुंतवणूकीचे निर्णय घेणं योग्य मानले जात आहे. ड्रोनाचार्य कंपनी या आयपीओअंतर्गत 62.90 लाख लाख त इक्विटी शेअर जारी करत आहे. या आपीओ अंतर्गत 15 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
Droneacharya Aerial Innovations IPO 52 ते 54 रुपये या प्राइस बॅडवर आणि 2 हजार शेअर्स इतक्या लॉट साईजवर निश्चित केलेला आहे. यामुळे 1.08 लाख रुपये इतकी गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांना करावी लागेल. या कंपनीच्या शेअर्सचे वाटप 20 डिसेंबरला तर त्यानंतर 23 डिसेंबरला कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध होतील.
असा करेल कंपनी पैशाचा वापर
यातून उभारलेल्या पैशांचा उपयोग ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी खरेदीसाठी वापरणार आहे. यामध्ये ड्रोनसह इतर खरेदीचा समावेश आहे. ड्रोनाचार्य ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे.
सर्वेक्षण, वितरण अशा कारणासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. यासाठी वापर वाढतही आहे. यामुळे या क्षेत्रात वाढ होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.
ड्रोनाचार्य मार्च 2022 पासून ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत 180 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना कंपनीने प्रशिक्षण दिले आहे. ड्रोनाचार्य ही देशातील अशी पहिली खाजगी कंपनी आहे जिला डीजीसीएकडून रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन परवाना मिळाला आहे. या आर्थिक वर्षातील 2022-23 मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कंपनीकडून 3.09 कोटींची उलाढालीसह 72.06 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)