• 24 Sep, 2023 02:14

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या माध्यमातून होतो दुप्पट फायदा, तो कसा? जाणून घ्या

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna

Image Source : https://twitter.com/

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna: नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटद्वारे चालवल्या जाणार्‍या महिलाभिमुख क्षेत्रीय बचत योजनेत सहभागी होऊन महिला चांगली कमाई करू शकतात. या अंतर्गत एजंट बनणाऱ्या महिलांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चार टक्के कमिशन दिले जाते. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna 2022: नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटद्वारे (National Savings Institute)चालवल्या जाणार्‍या महिलाभिमुख क्षेत्रीय बचत योजनेत सहभागी होऊन महिला चांगली कमाई करू शकतात. या अंतर्गत एजंट बनणाऱ्या महिलांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चार टक्के कमिशन दिले जाते. जिल्हा बचत कार्यालयात जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असलेल्या सरकारी योजनांशी लोकांना जोडण्यासाठी एजंट होण्यासाठी नोंदणी करावी लागते. पोस्ट ऑफिसचे क्षेत्र महिलांना वितरित केले जाईल, जिथे त्यांना लोकांची बचत खाती उघडून कमिशन (Commission)मिळू शकेल. खाते उघडल्यानंतर त्यात जमा केलेल्या रकमेपैकी चार टक्के रक्कम पोस्ट ऑफिसमधून मिळणार आहे. या योजनेचे एजंट बनून महिलांना रोजगार प्राप्त होतो. महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना 1 एप्रिल 1972 पासून लागू झाली आहे.


रोजगार आणि बचत (Employment and Savings)

जिल्हा बचत कार्यालयात जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असलेल्या सरकारी योजनांशी लोकांना जोडण्यासाठी एजंट (Agent) होण्यासाठी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी करून एजंट झाल्यानंतर पोस्ट ऑफिसच्या क्षेत्रातील लोकांना त्या एजंटकडे आपले अकाऊंट ओपन करता येते. त्या अकाऊंटमध्ये दर महिन्याला 100 रुपये 200 रुपये 500 रुपये असे पैसे एजंटकडे देऊन आपल्या खात्यात जमा करावे लागतात, त्याला R.D. म्हणतात. यावर व्याज सुद्धा मिळते. म्हणजेच तुम्ही एजंट झालात तर तुम्हाला इन्कम मिळते आणि ग्राहक झालात तर तुमची बचतही होते. मंजुरी  करणाऱ्या किंवा महिन्याचे मोजके इन्कम असणाऱ्या महिलांसाठी हा बेस्ट बचत प्लॅन आहे. 5 वर्ष बचत करून त्यावरील व्याजसाहित रक्कम तुम्हाला मिळते. उदा. तुम्ही दर महिन्याला 100 रुपये बचत करत आहात तर 5 वर्षाने ती  बचत 6 हजार रुपये होणार आणि त्यावरील व्याज धरून तुमच्याकडे 7 हजार रूपयाच्या वर बचत रक्कम असेल. 


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पासपोर्ट साईज फोटो (Passport size photograph)
  • ओळखपत्र (Identification card) तुम्हाला जर या योजनेचे ग्राहक व्हायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याबद्दल माहिती मिळवू शकता, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

उद्दिष्टे 

  • कौटुंबिक बजेटमध्ये गृहिणींना शिक्षित करणे.
  • घरातील आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांमध्ये काटकसरीची सवय लावणे.
  • I.P.O मधील गुंतवणुकीसाठी प्रचार आणि सुरक्षित करण्यासाठी लहान बचतकर्त्यांकडून 5 वर्षांची आवर्ती ठेव खाती.
  • देशाच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी संसाधने वाढवणे.