Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake ITR refund Alert! इन्कम टॅक्स रिफंडचा मेसेज तुम्हाला आलाय का? फसवणुकीपासून राहा सावधान

ITR refund fake message

ITR रिफंड मंजूर झाल्याचे बनावट मेसेज अनेकांना येत आहे. त्यापासून सावध राहण्याचा इशारा सरकारने दिला आहे. फिशिंग स्कॅमद्वारे करदात्यांची फसवणूक होऊ शकते. काय आहे हा घोटाळा जाणून घ्या.

Fake ITR refund Alert: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची 31 जुलैला मुदत संपल्यानंतर रिफंडसाठी करदाते वाट पाहत आहे. सुमारे 6 कोटी नागरिकांनी आत्तापर्यंत रिटर्न फाइल केला आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांकडून आता करदात्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. रिफंड जमा झाल्याचे बनावट मेसेज अनेकांना येत आहे. याबाबत आता सरकारनेही सावधानतेचा इशारा दिला आहे.

आयटीआर रिफंडचा बनावट मेसेज

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक संकेतस्थळाने याबाबत पडताळणी केली आहे. "15,490 रुपये टॅक्स रिफंड तुम्हाला मंजूर झाला आहे. ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, कृपया खाते क्रमांक पडताळून पाहा. जर रिफंडबद्दची माहिती चुकीची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन माहिती अपडेट करा" अशा आशयाचा बनावट संदेश अनेकांना येत आहे. या मेसेजमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी एक लिंकही दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक होऊ शकते, असे PIB ने म्हटले आहे.

फिशिंग स्कॅम 

आयकर विभागाकडून रिफंड देण्यासाठी कोणताही लिंक पाठवली जात नाही. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती मागितली जात नाही. त्यामुळे अशा बनावट संदेशांना रिप्लाय देऊ नका, तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करा. या मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा फिशिंग प्रकारचा सायबर घोटाळा असल्याचे समोर आले आहे.

बनावट रिफंडचा मेसेज आल्यास काय कराल?

मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक आणि डाउनलोड करू नका. रिप्लाय करायचेही टाळा.

बँक खाते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इतर संवेदनशील माहिती लिंकवर क्लिक करून भरू नका. 

अँटिव्हायस, फायरवॉल सुरक्षा लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला ठेवा. 

बनावट मेल, मेसेज, लिंकची माहिती webmanager@incometax.gov.in ला पाठवा. incident@cert-in.org.in या मेलवरही तुम्ही माहिती पाठवू शकता.

आयकर विभागाला बनावट संदेशाची माहिती दिल्यास तुम्ही हा मेसेज डिलिट करून टाका.