Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Payment Delay: हप्ता थकल्यास SIP बंद होते का? काय आहेत नियम जाणून घ्या

SIP Payment Delay

Image Source : www.nuvamawealth.com

अनेकांना दरमहा उत्पन्न मिळत नाही. तसेच नोकरी गेल्यास, अचानक आर्थिक अडचण उभी राहिल्यानंतर SIP चा हप्ता भरता येणार नाही, अशी भीती असते. मग गुंतवणूक केलेल्या पैशांचं काय होईल, या भीतीने अनेकजण SIP सुरू करण्यात चालढकल करतात. हप्ता थकल्यास SIP चं काय होतं ते जाणून घ्या.

SIP Payment Delay: SIP मध्ये गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदाराला योजनेत कशी गुंतवणूक करावी, हप्ता चुकल्यास काय होईल, किती दंड भरावा लागेल, खात्यात पैसे नसल्यावर काय होईल, असे अनेक प्रश्न पडतात. आज आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. चांगली एसआयपी निवडण्यासोबतच एसआयपी कशी काम करते हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अनेकांना मासिक उत्पन्न मिळत नाही. किंवा नोकरी गेल्यावर, अचानक आर्थिक अडचण आल्यानंतर SIP चा हप्ता भरता येणार नाही, अशी भीती असते. मग गुंतवणूक केलेल्या पैशांचं काय होईल, यामुळे अनेकजण SIP सुरू करण्यात चालढकल करतात. मात्र, तुम्ही तसे करू नका. या लेखात जाणून घेऊया एसआयपीचा हप्ता थकल्यास काय होते? पैशांची चणचण असल्यास SIP कायमची बंद करावी की तात्पुरती बंद करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

हप्ता थकल्यास SIP बंद होते का?

बँक, ब्रोकर्स संस्था किंवा डिस्ट्रिब्युटर्सकडून गुंतवणूकदार सहसा SIP योजना सुरू करतो. त्यासाठी बँकेतून दरमहा ठराविक रक्कम कापून घेतली जाते. खात्यात आवश्यक बॅलन्स ठेवणे ही गुंतवणूकदाराची जबाबदारी. मात्र, आर्थिक अडचण किंवा इतर कारणांमुळे खात्यात पैसे नसतील तर एसआयपीचा हप्ता थकेल. अशा वेळी योजना लगेच बंद होणार नाही. 

किती हप्ते थकल्यानंतर SIP बंद होऊ शकते?

SIP चा हप्ता थकल्यास अॅसेट मॅनेजमेंट कंपनी सहसा कोणताही दंड आकारत नाही. मात्र, ब्रोकर संस्था बँक दंड आकारू शकते. सलग 3 महिने हप्ता थकल्यास SIP बंद होऊ शकते. बंद झाली तरी गुंतवणूकदार आधी गुंतवलेले सर्व पैसे काढून घेऊ शकतो.   

SIP बंद होऊ नये म्हणून काय करता येईल?

जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल मासिक हप्ता भरण्यास तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही SIP तात्पुरती बंद (पॉझ) करू शकता. SIP तात्पुरती बंद म्हणजे योजना कायमची बंद नव्हे. तुम्ही ठराविक कालावधीसाठी योजना बंद करू शकता. म्हणजेच तुम्हाला त्या काळात हप्ता भरावा लागणार नाही. मात्र, 30 दिवस आधी तुम्हाला ब्रोकर संस्थेला तसे कळवावे लागेल. 

आजकाल ऑनलाइन अॅपमधूनही तात्पुरती पॉलिसी बंद करता येते. जर तुम्ही ऑफलाइन योजना घेतली असेल तर कार्यालयात जाऊन तात्पुरती बंद करू शकता. असे केल्यास आधी भरलेले हप्ते तसेच गुंतवून राहतील. त्यावर परतावाही मिळत राहील. भविष्यात जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही पुन्हा SIP सुरू करू शकता.