Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Plant : मनी प्लांट घरात लावल्याने संपत्तीत वाढ होते का? समज की गैरसमज, जाणून घ्या

Money Plant

काही लोक तर दुसऱ्याच्या घरी असलेल्या मनी प्लांटच्या वेलीचा छोटासा भाग अक्षरशः चोरून आपल्या घरी आणतात. चोरून आणलेला मनी प्लांट आपल्या घरात लावल्यास अधिक आर्थिक भरभराट होते असा काहींचा समज आहे.

मनी प्लांट म्हणजे काय हे काही नव्याने सांगायला नको. आजकाल अनेकांच्या घरात मनी प्लांट असतो. Epipremnum aureum किंवा Scindapsus aureus असे या मनी प्लांटचे वैज्ञानिक नाव आहे. परंतु बहुतेक लोक या वेलीला मनी प्लांट असंच म्हणतात. एक इनडोअर, शोभेचे झाड म्हणूनही मनी प्लांट ओळखले जाते. खरे तर मनी प्लांट काही भारतीय वनस्पती नाही. अभ्यासकांच्या मते ही वनस्पती दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून भारतात आली आहे. परंतु आता ही वनस्पती इतकी सर्वसाधारण झालीये की प्रत्येक घरात हिचे वास्तव्य पाहायला मिळते आहे.

पैसे आकर्षित करणारी वनस्पती?

मनी प्लांट दिसायला सुंदर आणि नाजूक जरूर आहे. याला पाणी देखील कमी लागते आणि विशेष देखभालीची गरज नाहीये. उष्ण वातावरणात, दमट वातावरणात ही वनस्पती वाढते. काही लोक तर दुसऱ्याच्या घरी असलेल्या मनी प्लांटच्या वेलीचा छोटासा भाग अक्षरशः चोरून आपल्या घरी आणतात. चोरून आणलेला मनी प्लांट आपल्या घरात लावल्यास अधिक आर्थिक भरभराट होते असा काहींचा समज आहे.

भारतात या वनस्पतीबद्दल सामन्यांच्या अशा वेगवेगळ्या धारणा आहेत. परंतु याला कुठलाही शास्त्रीय पुरावा किंवा आधार नाहीये. अशी कुठलीही वनस्पती लावल्याने आर्थिक समृद्धी येत नाही हे लक्षात ठेवा. आर्थिक भरभराट करून घ्यायची असेल तर मेहनतीला आणि गुंतवणुकीला पर्याय नाही हे लक्षात घ्या.

सकारात्मक वातावरण आणि सजावट 

तर, आधीच सांगितल्याप्रमाणे मनी प्लांट घरात लावल्याने कुठलाही आर्थिक फायदा होत नाही. मात्र घराच्या सजावटीसाठी ही वनस्पती उत्तम मानली जाते. हिरवीगार मनी प्लांटची वेल घर सजावटीसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. नर्सरीत ही वनस्पती 200-250 रुपयांना मिळते. यानिमित्ताने नर्सरी बिजनेस मात्र जोरदार सुरु आहे!

कशी होईल आर्थिक प्रगती?

तर मित्रांनो, असे कुठलेही रोपटे, अथवा वनस्पती आपल्या घरात लावली म्हणजे आपली आर्थिक भरभराट होईल असे समजण्याचे कारण नाही. परंतु, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की संपत्ती जमा करण्यामध्ये आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे या सगळ्या घटकांचा समावेश आहे.

तुमच्याकडे महिन्याकाठी आलेल्या पैशाचे तुम्ही नियोजन कसे करता? ते कुठे गुंतवता? कोणत्या योजनांमध्ये गुंतवता यावर खरे तर तुमची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते. तेव्हा या सगळ्या अंधश्रद्धा सोडा आणि आर्थिक साक्षर बना. तुम्हांला गुंतवणुकीचे काही पर्याय जाणून घ्यायचे असतील, बँकेच्या आणि सरकारच्या काही योजना जाणून घ्यायच्या असतील तर महामनी डॉट कॉमला भेट द्या, तुमच्या सर्व समस्यांचे समाधान या पोर्टलच्या माध्यमातून केले जाईल.