Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठीचे हे 5 ॲप्स माहित आहेत का तुम्हाला?

Investment App for Mutual Fund

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंडधील गुंतवणुकीसाठी कोणताही फिजिकल फॉर्म भरावा लागत नाही किंवा गुंतवणुकीचा कोणता पुरावाही जपून ठेवावा लागत नाही. तर तुम्हीही खाली दिलेल्या ॲप्सच्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

 Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही सध्याची सर्वांत प्रसिद्ध गुंतवणूक मानली जाते. यामध्ये किमान गुंतवणुकीसह नियमितपणे गुंतवणूक करता येते. तसेच म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळत आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीकडे ओढा वाढत आहे.

म्युच्युअल फंडमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते. पण यासाठी प्रत्येक फंडचा एक मॅनेजर असतो. तो कुठे, कशी आणि किती गुंतवणूक करायची? याचा निर्णय घेत असतो. त्यामुळे शेअर मार्केटप्रमाणे इथे गुंतवणूकदाराला सतत अलर्ट राहावे लागत नाही. म्युच्युअल फंडमध्ये ही जबाबदारी फंड मॅनेजर पार पाडतो. तरीही म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त गुंतवणूक मानली जाते.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक प्रक्रिया खूपच सोपी

म्युच्युअल फंडबद्दल अनेक जणांना बेसिक गोष्टी माहित नाहीत. जसे की पूर्वी एलआयसी एजंट इन्शुरन्स पॉलिसीसोबत गुंतवणुकीचे काही कागदपत्र देत होते किंवा पोस्टातूनही व बँकेतून मुदत ठेवींचं प्रमाणपत्र मिळतं. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत असं काहीच नसतं. यामध्ये जी काही गुंतवणूक केली जाते. ती पूर्णत: ऑनलाईन गुंतवणूक असते. यासाठी कोणताही फिजिकल फॉर्म भरावा लागत नाही किंवा गुंतवणुकीचा कोणता पुरावाही जपून ठेवावा लागत नाही. तर तुम्हीही ऑनलाईन पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

आज आपण अशा ॲप्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

MYCAMS Mutual Fund App

MyCAMS हे ॲप कॅम्सच्या वेबसाईटवर आधारित तयार करण्यात आलेले ॲप आहे. तुमचे जर कॅम्सच्या वेबसाईटवर लॉगिन असेल तर तुम्ही त्या लॉगिन आयडीवर मायकॅम्सचे ॲपही लॉगिन करू शकता.

KFinKart Mutual Fund App

KFinKart हे सुद्धा विविध म्युच्युअल फंडमधील विविध आर्थिक सेवा देणारे ॲप आहे. हे ॲप KFin टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जाते.या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.

Mutual Fund Utility (MFU)

म्युच्युअल फंड युटिलिटी हे ॲप MF Utility India Pvt Ltd (MFUI) यांच्याद्वारे चालवले जाते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांच्या मार्गदर्शनाखील हे ॲप ॲग्रीगेटर पोर्टल म्हणून काम करते. या ॲपमधून ग्राहकांना बँकिंग, पेमेंट गेट वे, केवायसी, म्युच्युअल फंड रजिस्ट्रेशन आदी सुविधा मिळतात.

BSE StAR MF

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 2009 मध्ये म्युच्युअल फंडचे युनिट्स खरेदी-विक्री करण्यासाठी BSE StAR MF हे ॲप सुरू केले आहे. हे ॲपसुद्धा AMFI शी नोंदणीकृत असून, म्युच्युअल फंडशी संबंधित सर्व सेवासुविधांचा लाभ या ॲपमधून घेता येतो. हे ॲप CDSL आणि NSDL या दोन्ही डिपॉझिटरीजशी कनेक्टेड असल्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील सर्व माहिती ग्राहकांना या ॲपच्या माध्यमातून पाहता येते.

MF Central

एमएफ सेंट्रल ॲपमध्ये KFintech आणि CAMS या दोन्ही ॲपचे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे CAMS मध्ये निवडक 15 म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येते आणि KFintech मध्ये जवळपास 25 म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते. पण MF Central मधून सर्व म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते.