तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही बेसिक सॅलरी (basic salary), ग्रॉस सॅलरी (gross salary) आणि नेट सॅलरी (net salary) बद्दल ऐकले असेलच. तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये (salary slip) बेसिक सॅलरीचा उल्लेख केलेला आढळतो. परंतु बर्याच वेळा जेव्हा एकूण पगार किंवा निव्वळ पगार असा प्रश्न विचारला जातो तेव्हा लोक त्याबद्दल संभ्रमात पडतात. बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमध्ये काय फरक आहे (difference between basic, gross and net salary) आणि बेसिक सॅलरी कमी किंवा जास्त असल्यास तुमच्यावर काय परिणाम होतो? ते आज जाणून घेवूया.
Table of contents [Show]
बेसिक सॅलरी
बेसिक सॅलरी ही अशी रक्कम असते ज्याच्यावर कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती असते. हा पगाराच्या रचनेचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. बेसिक सॅलरी एकूण CTC च्या 40-45% असते. यात एचआरए, बोनस आणि कोणत्याही प्रकारची कर कपात किंवा कोणतीही अतिरिक्त भरपाई, ओव्हरटाइम इत्यादींचा समावेश नसतो.
ग्रॉस सॅलरी
बेसिक सॅलरीसोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता आणि इतर सर्व भत्ते जोडून कोणत्याही प्रकारची कपात करण्यापूर्वी, जी रक्कम तयार होते त्याला ग्रॉस सॅलरी असे म्हणतात. समजा तुमचा मूळ पगार 20000 आहे, जर 4000 रुपये महागाई भत्ता, रु.9000 घरभाडे भत्ता आणि रु.1000 चा वाहतूक भत्ता आणि रु.5000 चे इतर भत्ते जोडले तर तुमची ग्रॉस सॅलरी रु.39000 होईल.
नेट सॅलरी
ग्रॉस सॅलरीमधून कर, भविष्य निर्वाह निधी आणि इतर अन्य कपात केल्यानंतर तुम्हाला पगार म्हणून मिळणारी रक्कम तुमची नेट सॅलरी असते. नेट सॅलरी ही एखाद्या कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी असते. म्हणजेच दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या खात्यात येणारी ही अंतिम रक्कम असते.
बेसिक सॅलरीचा तुमच्यावर कसा परिणाम होतो?
बेसिक सॅलरी हा तुमच्या सॅलरीच्या स्ट्रक्चरचा बेस आहे. या बेसवरच, सॅलरी पॅकेजचे सर्व घटक मोजले जातात. जर बेसिक सॅलरी खूप कमी किंवा खूप जास्त असेल तर दोन्ही परिस्थिती तुमच्यावर परिणाम करतात. बेसिक सॅलरीवर नेहमी कर लागू असतो त्यामुळे तो CTC च्या 40 ते 50% पेक्षा जास्त नसावा. मूळ पगार जास्त असल्यास कर कापला जातो. पण जर ते खूप कमी केले तर त्याचा परिणाम तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरवर होतो. बेसिक सॅलरी कमी करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा पीएफ योगदान जास्त होत नाही. ईपीएफओच्या नियमांनुसार कर्मचार्यांच्या बेसिक सॅलरीच्या आणि डीए चा 12 टक्के दरमहा पीएफ फंडात जातो. कंपनीलाही तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांसाठी द्यावी लागते. अशा परिस्थितीत जर तुमची बेसिक सॅलरी कमी असेल तर तुमचा पीएफ देखील कमी कापला जाईल. यामुळे तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.
बेसिक सॅलरी कशी ठरवली जाते?
सध्या सॅलरीची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. याचा फायदा कंपन्या घेतात. सॅलरी स्ट्रक्चर तयार करताना अनेक वेळा कंपन्या तुमची बेसिक सॅलरी कमी ठेवतात आणि इतर भत्ते वाढवतात. अशा परिस्थितीत, तुम्ही कंपनीला तुमच्यानुसार तुमचा मूळ पगार निश्चित करण्यास भाग पाडू शकत नाही. परंतु जर तुमचा मूळ पगार खूपच कमी असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीतील एचआर विभागाला तो वाढवण्याची विनंती करू शकता.