Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Do you know How much the Film Cost: सुपरडुपर हीट असलेल्या 'वेड' चित्रपटाचा खर्च किती आला माहिती का?

Do you know How much the Film Cost

Image Source : http://www.koimoi.com/

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने बाॅक्सआॅफीसवर रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आर्ची व परश्याच्या सैराट या चित्रपटालादेखील कमाईत मागे टाकले आहे. अशा या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या चित्रपटाचा खर्च किती आला, याबाबत जाणून घेवुयात.

Do you know How much the Film Cost: वेड (Ved)` या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. 30 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची घौडदौड अजून ही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर सोशलमिडीयावर धुमाकूळ घातला आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाचे कौतुक बाॅलिवुड कलाकारांनीदेखील केले आहे. आज हा चित्रपट बॉक्सऑफिसवर राज्य करीत आहे. मात्र हा चित्रपट तयार करताना किती खर्च आला याबाबत जाणून घेवुयात. 

वेड चित्रपट बनविण्यासाठी किती आला खर्च (Ved Film Cost)

वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तेरा ते चौदा दिवस झाले तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू अजून आहे. अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल 2.35 कोटींचा गल्ला जमवला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच त्याचा निर्मिती खर्च पूर्णपणे वसूल केला आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी 15 कोटी रूपये इतका खर्च करण्यात आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईच्याबाबतीत दुप्पट कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या काही दिवसाच बॉक्स ऑफिसवर 35 कोटींहून अधिकचा गल्ला जमविला. आज ही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट आहे. त्यामुळे पुढे हा चित्रपट आणखी किती कमाई करेल याकडे सर्वाचे लक्ष आहे. 

कमाईबाबत सैराटला टाकले मागे (Ved Movie Earnings)

मराठी चित्रपटसृष्टीत एकाच दिवशी बंपर कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. यामध्ये या चित्रपटाने सैराट चित्रपटालादेखील मागे टाकले आहे. वेड या चित्रपटाने दहाव्या दिवशीदेखील तब्बल 5.70 कोटींची अफलातून कमाई केली होती. यापूर्वी हा रेकॉर्ड सैराट चित्रपटाच्या नावी होता. सैराटने एका दिवसात सुमारे साडे चार कोटींची कमाई केली होती. आज वेड चित्रपटाने हा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. सोशलमिडीयावरदेखील या चित्रपटाचाच डंका वाजताना दिसत आहे. तसेच या चित्रपटातील ‘वेड लागले’ या गाण्याची भुरळ विदेशातील लोकांनादेखील पडली आहे. कारण इंन्स्टाग्रामवर कित्येक परकीय लोक या गाण्यावर रिल्स करताना पाहायला मिळत आहेत.