Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ved Movie Box office Collection: महाराष्ट्राला रितेशच्या चित्रपटाने लावले 'वेड', 2 दिवसात कमविले कोटी रूपये

Ved Movie Box office Collection

Image Source : http://www.ottplay.com/

Ved Movie Box office Collection: अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया डिसुजा-देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण सोशल मिडियावर या गाण्याचा डंका वाजताना दिसत आहे. हा चित्रपट नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाव्दारे त्याने दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तर रितेशची पत्नी म्हणजे जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे. रितेश व जिनिलियाने या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू करेल, अशी प्रतिक्रिया अनेक सेलिब्रिटीनी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच व्यक्त केली होती. त्यांची ही प्रतिक्रिया योग्य ठरत, वेड या चित्रपटाने फक्त दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे, याविषयी जाणून घेऊयात. 

ओपनिंग डे ला 3.50 कोटींची कमाई

मराठी चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर ओपनिंग डे ला ला 3.50 कोटींची कमाई करणारा वेड या चित्रपटाने दमदार ओपनिंग करणाऱ्या यादीत पाचव्या क्रमाकांचे स्थान मिळविले आहे. ‘टाईमपास 2’ नंतर 3.50 कोटींची कमाई करणारा हा पाचवा चित्रपट ठरला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ‘सैराट’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.60 कोटी कमविले होते. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या सिनेमाने 3.10 कोटीचा गल्ला मिळविला होता. ‘नटसम्राट’देखील या यादीत आहे. वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून ठेवले आहे. आता पुढे ही हा चित्रपट तगडी रक्कमची कमाई करेल असे चित्र दिसत आहे.

वेड चित्रपटाविषयी...

वेड या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख व जिनिलिया देशमुखसोबतच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच सलमान खान पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत झळकला. सलमान खान व रितेश देशमुखच्या वेड लागलयं...वेड लागलयं या गाण्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राने ठेका धरला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉलिवुड व मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे.