Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Whatsapp Pay साठी असे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

WhatsApp Pay Registration

Whatsapp Pay ची सर्व्हिस युपीआयवर आधारित आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे बॅंक अकाऊंट Whatsapp Pay शी लिंक करून तुमच्या मित्राला किंवा खरेदी केलेल्या वस्तुचे पेमेंट करू शकता.

Instant Messaging App Whatsapp हा सध्या आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. बहुतांश लोक व्हॉट्सअॅपचा वापर चॅटिंग आणि मॅसेजिंगसाठी करतात. पण तुम्हाला माहित आहे का, व्हॉट्सअॅप हे आता फक्त मॅसेजिंग अॅप राहिले नसून या अॅपद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. एकमेकांना पैसे पाठवू शकता.

Whatsapp 1

Whatsapp Pay मधून पैसे ट्रान्सफर करता येतात. व्हॉट्सअॅपची ही सेवा युपीआय (UPI)वर आधारित आहे. तुम्ही तुमचे बॅंक खाते या सेवेशी जोडून सहज पैसे ट्रान्सफर करू शकता.

Whatsapp 2

Whatsapp Pay सुरू करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या फोनमधील Whatsapp सुरू करा. अॅपमध्ये डाव्या बाजूस असलेल्या तीन डॉटवर क्लिक करून मेनू बार ओपन करा. त्यामधून Payments या पर्यायावर क्लिक करा. मेनूमधून Add Payment Method हा पर्याय निवडा.

Whatsapp 3

आता, तुमचे ज्या बॅंकेत खाते आहे; त्याची निवड करा. खाते निवडल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर बॅंक खाते बरोबर असल्याचे पडताळून Done बटण क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युपीआय आयडी, पेमेंट हिस्ट्री आणि लिंक केलेले बॅंक खाते दिसू लागेल.