Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अल्पवयीन मुलांना आयटीआर भरणं गरजेचं आहे का?

ITR FORM  income tax

केंद्र सरकारने बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत 18 वर्षांखालील बालकांना (Minors) काम करण्यास मज्जाव ही केला आहे. पण तरीही 18 वर्षांखालील मुलांना त्यांनी केलेल्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यांना त्या पैशांवर नियमानुसार टॅक्स भरावा लागतो.

भारतात 18 वर्षांखालील मुले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत; त्यातून त्यांना पैसेही मिळत आहे. अर्थात याला कायद्याने मान्यता नाही. केंद्र सरकारने बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत 18 वर्षांखालील बालकांना (Minors)  काम करण्यास मज्जाव ही केला आहे. पण तरीही 18 वर्षांखालील मुलांना त्यांनी केलेल्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यांना त्या पैशांवर नियमानुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो. (Minors have to file ITR?)

उदाहरणार्थ, एखाद्या मुलाकडे विशेष कौशल्य आहे आणि त्याच्या आधारावर त्याने एखादी स्पर्धा जिंकली आहे किंवा त्याला रोख रकमेतून बक्षिस मिळाले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मायनर म्हणजेच 18 वर्षांखालील मुलाने इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग (ITR Filing 2022) करणं गरजेचं आहे. समजा एका पॉप्युलर टीव्ही शोमध्ये 18 वर्षांखालील मुलाने बक्षिस आणि मोठी रक्कम जिंकली असेल तर त्याला त्या रकमेवर टॅक्स भरावा लागणार.


अल्पवयीन (18 वर्षांखालील किंवा अज्ञान) म्हणजे काय?

भारतात, 18 वर्षांखालील मुले/मुलींना अल्पवयीन (Minor) म्हटलं जातं. भारतीय बहुसंख्य कायदा, 1975 (Indian Majority Act, 1975) अंतर्गत भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती 18 वर्षांनंतर कायदेशीर सज्ञान आहे, असं म्हटले आहे.

18 वर्षांखालील किंवा अल्पवयीन मुलांसाठी पॅनकार्ड असते का?

होय, 18 वर्षांखालील मुलांचे पॅनकार्ड काढता येते.

क्लबिंग म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे भारतात कोणतीही व्यक्ती त्याने कमावलेल्या पैशांवर टॅक्स भरते. क्लबिंग हे काही विशेष परिस्थितीत लागू होते. जसे की, एखाद्याची करपात्र (Taxable) मालमत्ता ही इतर व्यक्तीच्या करपात्र मालमत्तेसह एकत्रित केली जाते. अशावेळी त्या दोन्ही व्यक्तींना टॅक्स भरावा लागतो.

18 वर्षांखालील मुले/मुलींना टॅक्स भरावा लागतो का?

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 64(1A) मध्ये नमूद केल्याप्रमाणे 18 वर्षांखालील मुलांना मिळालेली रक्कम, बक्षिस हे पालकांच्या उत्पन्नामध्ये जमा होते. त्यानंतर पालकांचे उत्पन्न ज्या स्लॅबमध्ये येते. त्यानुसार त्यावर टॅक्स आकारला जातो. पण जर प्रत्येक महिन्याला मुलांचे उत्पन्न 1500 रूपयांपेक्षा कमी असेल तर ते पालकांच्या उत्पन्नात पकडले जात नाही. पण जर मुलांचे मासिक उत्पन्न 1500 रूपयांपेक्षा अधिक असेल तर पालकांना त्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागेल. कारण ते उत्पन्न पालकांचे उत्पन्न म्हणून गृहित धरले जाते. पालक दोन मुलांमागे प्रत्येकी 1500 रूपयांपर्यंत टॅक्स सवलत घेऊ शकतात.

कलम 64 (1) अंतर्गत अल्पवयीन मुलांमध्ये कोणाचा समावेश होतो?

सावत्र मुले (Step Children)
दत्तक मुले (Adopted Childrens)

अल्पवयीन मुलांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट करण्याबाबतचे नियम

  • अल्पवयीन मुलाचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर, त्या अल्पवयीन मुलाचे उत्पन्न हे पालकांच्या उत्पन्नाशी आणि विशेषकरून ज्या पालकाचे उत्पन्न जास्त आहे, त्याला मिळेल.
  • घटस्फोटित पालकांच्या बाबतीत ज्या पालकाकडे मुलाचा ताबा आहे; त्यांच्या उत्पन्नात अल्पवयीन मुलाचे उत्पन्न जोडले जाते.
  • अल्पवयीन मुलगा अनाथ असेल त्याच्यासाठी वेगळे इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फायलिंग करणे आवश्यक आहे.
  • एखादे मूल अपंग असेल तर त्या मुलाचे उत्पन्न इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 80U अंतर्गत ते उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात पकडले जात नाही.
  • जर अल्पवयीन मुलाने आपले विशेष कौशल्यं, प्रतिभा किंवा ज्ञानाचा वापर करून उत्पन्न मिळवले असेल तर ते उत्पन्न करपात्र असेल.


अल्पवयीन मुलासाठी स्लॅब दर काय आहे?

आर्थिक वर्ष 2021-22 आणि असेसमेंट वर्ष 2022-23 साठी अल्पवयीन मुलांसाठी लागू असलेले इन्कम टॅक्स स्लॅब खालीलप्रमाणे आहेत.

इन्कम टॅक्स स्लॅब

टॅक्स दर (सध्याची योजना)

टॅक्स दर (नवीन योजना)

2.5 लाखापर्यंत

शून्य

शून्य

2.5 ते 5लाख

5 टक्के (कलम 87A अंतर्गत 12,500रूपयांची सवलत उपलब्ध)

शून्य

ते 7.5 लाख 

20टक्के 

10टक्के

7.5 ते 10लाख

20टक्के

15टक्के

10ते 12.5 लाख

30टक्के

20टक्के

12.5ते 15लाख 

30टक्के

25टक्के

15लाख आणि त्याहून अधिक

30टक्के

30टक्के

अल्पवयीन मुले/मुली आयटीआर भरू शकतात का?

अल्पवयीन मुलांचा विचार करता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादा नाही. इथे वयापेक्षा उत्पन्नाला अधिक महत्त्व आहे. अल्पवयीन मुलांचे बचतीचे पैसे, त्यांच्या नावे केलेली गुंतवणूक किंवा त्यांनी मिळवलेले पैसे, टीव्ही शोज, चित्रपटांमधून केलेली कामे किंवा बक्षिसांच्या रकमेच्या आधारावर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग केले जाऊ शकते. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जमा झाले नाही तर अल्पवयीन मुलाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागेल.

अल्पवयीन मुलांच्यावतीने आयटीआर कोण भरू शकतं?

इन्कम टॅक्स कायदा, 1961च्या कलम 140, 159, 160 अंतर्गत एखादी व्यक्ती स्वतःहून इन्कम टॅक्सशी संबंधित बाबींकडे लक्ष देऊ शकत नसेल तर पालक किंवा इतर कोणतीही सक्षम व्यक्ती त्याच्यावतीने हे काम करू शकते. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत अशा कामे पार पाडण्यासाठी पालक किंवा प्रतिनिधी म्हणून अधिकृतरीत्या नोंद करून ते अल्पवयीन मुलांचे रिटर्न दाखल करू शकतात.