Diwali 2022 Car offers & discounts: आपण खरेदी केलेली वस्तु घरात आणतो, म्हणजेच लक्ष्मी घरात आणतो असे म्हटले जाते. म्हणून अनेक जण दिवाळीत वस्तु खरेदी करायचा प्लॅन करतात. बरेचसे लोक नवीन व्यवसाय, गाडी दिवाळीत घेतात. म्हणून दिवाळीला अनेक भन्नाट ऑफर कंपन्यांकडून दिले जातात. त्यापैकी कॅश डिस्काउंट म्हणजेच रोख सवलत ही कारवरील ऑफर किंमत आहे जी कारच्या एकूण ऑन-रोड किमतीतुन कमी केली जाते. या दिवाळीला सुद्धा अनेक मोटर्स कंपन्यांनी कॅश डिस्काउंट दिले आहेत ते पुढीलप्रमाणे.
Table of contents [Show]
टाटा नेक्सॉन Tata Nexon
टाटा मोटर्स सणासुदीच्या हंगामात आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) Nexon वर सूट देत आहे. SUV वर एकूण 20,000 रुपयांची सूट देत आहे. ते त्याच्या डिझेल व्हेरिएंटवर 15,000रु. एक्सचेंज बोनस आणि 5,000 रु. कॉर्पोरेट डिस्काउंट देखील देत आहे. कंपनी आपल्या पेट्रोल व्हेरियंटवर 3,000रु. कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. नेक्सॉनने ऑगस्टमध्ये Hyundai Creta ला मागे टाकले.
मारुती इग्निस Maruti Ignis
मारुती इग्निस ही पाच सीटर क्रॉसओवर आहे जी कॉम्पॅक्ट कारचा परिपूर्ण अनुभव देते. मारुती इग्निस ही त्याच्या Unconventional डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे, जी किफायतशीर किमतीत अनेक वैशिष्ट्यांसह असलेल्या कारचे उदाहरण आहे. एक्सचेंज बोनस 15,000रु. आहे. कॉर्पोरेट सवलत 5,000 रु. आहे. कॅश डिस्काउंट 10,000 रु. आहे.
ह्युंदाई ऑरा सीएनजी Hyundai Aura CNG
ह्युंदाई ऑरा ज्याला Nios सारखेच इंजिन पर्याय मिळतात, त्यांच्या पेट्रोल प्रकारांवर 18,000 रुपयांपर्यंत सूट मिळते, तर पर्यावरण-अनुकूल CNG ट्रिमला या सणासुदीच्या मोसमातील कार सवलतींमध्ये 33,000 रु. चा लाभ मिळतो. कॅश डिस्काउंट(Cash discount) 20,000 CNG/रु. 5,000 रु. इतर प्रकारांवर मिळणार आहे. एक्सचेंज बोनस 10,000रु. मिळणार आहे आणि कॉर्पोरेट सूट 3,000 रु. मिळणार आहे.
रेनॉल्ट ट्रायबर Renault Triber
रेनॉल्ट ट्रायबर हे सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन आहे. ट्रायबर आणि क्विड या रेनॉल्टच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या कार आहेत. या सणासुदीच्या काळात, रेनॉल्ट आपल्या कविड हॅचबॅक आणि ट्रायबरच्या मॉडेल लाइन-अपवर 50,000 रु. पर्यंत सूट देत आहे. 15,000रु. कॅश डिस्काउंट मिळणार आहे. आणखी काही सूट मिळून एकूण 50,000 रु. रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.