आयसीसी मेन्स क्रिकेट विश्वचषक जेमतेम नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतात यंदा या विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात डिस्ने स्टारने ब्रॉडकास्ट अर्थात प्रक्षेपण हक्क मिळवण्यात सर्वाधिक बोली लावल्यानं ते हक्क त्यांना मिळाले होते.मात्र वेबकास्ट राईटस मिळवण्यात जिओ सिनेमाने बाजी मारली आहे. डिस्ने स्टारला आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्ट आणि डिजिटल राईटसही मिळाले आहेत. त्यामुळे आता ही संधी न दवडण्याचं स्टारनं ठरवलं आहे आणि फोन पे या कंपनीशी त्यांनी तब्बल 150 कोटी रुपयांचा करार केला आहे.
फोनपे ला काय होणार फायदा?
या विश्वचषकात 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. अशात त्यांना स्टार नेटवर्कच्या सर्व टिव्ही चॅनल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर प्रेझेन्स मिळणार आहे.
याही कंपन्यांसोबत डिस्नेने केलाय करार
डिस्नेने फक्त फोनपे बरोबरच करार केला आहगे असं नाही तर त्यांनी हिंदुस्तान यनिलिव्हर, कोकाकोला, महिंद्रा अँन्ड महिंद्रा सारख्या नामांकित कंपन्यांबरोबरही करार केला आहे. या करारातून स्टार मालामाल होणार आहे, तर या कंपन्यांना जाहीरातींद्वारे जगातल्या लोकांच्या घराघरात पोहोचता येणार आहे.
सर्वसामान्यांना विश्वचषकाचा आस्वाद मोफत पाहायला मिळणार
आयपीएल सामन्यांच्या वेळेस जिओ सिनेमाने ज्याप्रकारे लोकांना मोफत सामने दाखवत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता त्याचप्रकारे, जिओ सिनेमाच्या पावलावर पाऊल टाकत आता डिस्ने+हॉटस्टारही मोबाईल आणि टॅबलेटवर लोकांना फुकट सामने दाखवणार आहे. त्यामुळे एकीककडे घरी टिव्हीवर सामने पाहाण्याचा आनंद घेता येणार आहे तर दुसरीकडे प्रवास करत असल्यास मोबाईलवरगही सामने मोफत पाहाता येणार आहेत.