बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. खास करून ट्विटरवर (Twitter) ते सतत काही ना काही शेअर करत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टला चाहतेदेखील भरघोस प्रतिसाद देतात. सध्या ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी दरमहा 8 डॉलर्स शुल्क आकारले जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम 656.28 रुपये इतकी आहे.
हे शुक्ल भरल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला ट्विटरकडून ब्ल्यू टिक दिली जात नाही. यामध्ये बिगबींचा देखील समावेश आहे. याच अनुषंगाने बिगबींनी दिवसभरात तीन वेगवेगळ्या पोस्ट ट्विटरवर शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये अतिशय रंजक पद्धतीने ट्विटरशी संवाद साधत ट्विटरला मोलाचा सल्ला दिला आहे. या तीन ट्विटमधून बिग बी नक्की काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊ.
बिग बी ट्विटमध्ये काय म्हणाले?
सध्या सगळ्यांच्याच ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक गायब झाली आहे. त्यामुळे ट्विटरवर आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तीचे अकाउंट शोधण्यास अडचणी येत आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक देखील गायब झाली आहे.
या ब्ल्यू टिकसाठी त्यांनी ट्विटरला पैसेदेखील दिले आहेत. मात्र ट्विटरकडून अजूनही त्यांना ब्ल्यू टिक मिळाली नाही. याचसंदर्भात रंजक भाषेत बिगबी यांनी पहिली पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, Twitter भैय्या, आता तर पैसे पण भरलेत. आता तरी माझ्या नावापुढे ब्ल्यू टिक लावा. जेणेकरून लोकांना मी कोण आहे, ते समजेल. तुम्हाला हात तर जोडलेच आहेत, आता काय तुमच्या पाया पण पडू का?
तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ट्विटरला मोलाचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये ते ट्विटरला सांगत आहेत की, Twitter भैय्या आता एक एडिट पर्याय देखील उपलब्ध करून द्या. कारण कोणत्याही पोस्टमध्ये चूक झाली, तर एडिट करण्याची सोय नाही. ती पोस्ट थेट डिलीट करावी लागते. सध्या ट्विटरवर एडिट हा पर्याय उपलब्ध असल्याने बिगबी यांनी हा खोचक पण रंजक भाषेत मोलाचा सल्ला ट्विटरला दिला आहे.
तिसरी ट्विटरवरील पोस्ट तर अतिशय हास्यास्पद आहे. ज्यामध्ये ते रंजक आणि खोचक स्वरूपात एडिट पर्यायाबद्दल पुन्हा सांगत आहेत. ट्विटमध्ये चूक झाल्याने पहिली पोस्ट डिलीट करावी लागली. त्याबद्दल सॉरी सॉरी असं ते म्हणतायेत. त्यांच्या या तिन्ही पोस्टला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला.