Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dharmaj Crop Guard Listing: गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद; 237 रुपयांचा शेअर 266 रुपयांवर लिस्टिंग!

Dharmaj Crop Guard IPO Listing

Dharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.

Dharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर या शेअर्सची किंमत 266.05 रुपयांवर लिस्टिंग झाली. इश्यू प्राईसपेक्षा यामध्य 12.26 टक्क्यांनी वाढ झाली.

धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेड कंपनीने आयपीओची (Initial Public Offer-IPO) ऑफर प्राईस 216-237 रुपये निश्चित केली होती. पण आज लिस्टिंग होताना धर्माज कंपनीचा शेअर एनएसईवर 12.26 टक्क्यांनी वाढून 266.05 रुपये तर बीएसईवर 12.24 टक्क्यांनी वाढून 266 रुपयांवर लिस्टिंग झाला. गुंतवणूकदारांना प्रति शेअरमागे 29 रुपयांचा फायदा होत आहे.


धर्माज क्रॉप गार्डचा शेअर ओपन झाल्यानंतर बीएसईवर तो 278 रुपयांपर्यंत गेला तर एनएसईवर ओपन झाल्यानंतर अवघ्या दीड तासांत 279 रुपयांवर पोहोचला होता. धर्माज क्रॉप गार्ड कंपनी शेतीशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. जसे की, शेतीसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे उत्पादन, वितरण आणि मार्केटिंगमध्ये सहभागी आहे. धर्माज कंपनीकडून कीटकनाशके, बुरशीनाशक औषधे, पिकांची वाढ आणि उत्पादन वाढवणारी खते याचबरोबर व्यापारी ते ग्राहक (Business to Consumer – B2C) आणि व्यापारी ते व्यापारी (Business to Business – B2B) अशा मॉडेल्समध्येही कंपनी कार्यरत आहे. 

Dharmaj Share price chart
Source: https://money.rediff.com/

सेकंडरी मार्केटमध्ये 15 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता!

स्वस्तिका इन्वेस्टमार्टचे रिसर्च हेड संतोष मीना यांच्या मते, धर्माज कंपनीचा शेअर सेकंडरी मार्केटमध्ये 15 टक्क्यांपर्यंत नफा देईल, अशी मार्केटकडून अपेक्षा आहे. तसेच लॉन्ग टर्मसाठी सुद्धा हा शेअर चांगला ठरू शकतो. पण ज्या गुंतवणूकदारांना यात अडकून पडण्याची इच्छा नाही. अशा गुंतवणूकदारांनी 255 रुपयांवर स्टॉप लॉस लावून यातून बाहेर पडू शकता, असे मत संतोष मीना यांनी व्यक्त केले आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)