7th Pay Commission: रेल्वे सिनिअर सिटिझन वेलफेअर सोसायटीच्या (RSCWS) सदस्यांनी नुकतीच अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट घेऊन त्यांना 1 जानेवारी, 2024 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची विनंती केली. या मागणीमागे दोन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ते म्हणजे पुढील वर्षी डिअरनेस अलाऊन्स आणइ डिअरनेस रिड यामध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वे सिनिअर सिटिझन वेलफेअर सोसायटीने केंद्रीय वित्त मंत्रालयाला 30 मे 2023 रोजी निवदन देऊन सध्याच्या कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाची तातडीने का गरज आहे; याचे कारणासहित स्पष्टीकरण दिले आहे. या निवेदनाद्वारे संबंधित सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी 2024 पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे.
जुलै महिन्यात पगार वाढणार
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवून दिल्याचे बोलले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळत आहे. तो वाढवून 50 दिला जाणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 9000 रुपयांची वाढ होणार आहे.
‘या’ वर्षापासून आठवा वेतन लागू करण्याची मागणी
रेल्वे वेलफेअरने सोसायटीने नवीन वेतन आयोग 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना सोसोयटीने म्हटले आहे की, सरकार वेतन आयोग सादर करण्यासाठी बराच कालावधी घेते. काही वेळा तर 2-2 वर्षे लागली आहेत. त्यानंतर सरकार त्यावर विचार करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी वेळ घेते. त्यामुळे वेतन आयोग लागू होईपर्यंत बराच कालावधी निघून जातो. त्यामुळे सरकारने यावेळी लवकरात लवकर म्हणजे 1 जानेवारी, 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ द्यावा.
वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कसरत करावी लागत आहे. सरकारने ही भरपाईसुद्धा नवीन वेतन आयोगातून भरून द्यावी, अशी मागणी रेल्वे वेलफेअर सोसायटीने केली.
सोसायटीने ही मागणी करताना देशाच्या दरडोई उत्पन्नात आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ झाली. याबाबत सरकारला जाबदेखील विचारला आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात देशातील दरडोई उत्पन्न हे 93,293 रुपये होते. ते 2022-23 मध्ये 1,97,000 रुपये इतके झाले आहे. यात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. पण याच कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनात मात्र फक्त 42 टक्क्यांनी वाढ झाली.