क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency Rate Today) वाढ आजही सुरू आहे. बहुतेक डिजिटल टोकन ग्रीन लेव्हलवर ट्रेडिंग करत आहेत. जागतिक स्तरावर, 24 जानेवारी रोजी, क्रिप्टो मार्केट कॅपमध्ये (Crypto Market) 0.44 टक्के वाढ झाली आहे आणि ती $1.05 ट्रिलियनवर ट्रेड करत आहे. गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सीचे मूल्य 55.74 अब्ज डॉलरवर ट्रेड करत आहे, जे 6.92 टक्क्यांनी वाढले आहे. जागतिक स्तरावर, जगातील सर्वात मोठ्या डिजिटल टोकन बिटकॉइनची किंमत 1.3 टक्क्यांनी वाढली आहे आणि 23,051.65 डॉलरवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, इथरियमची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढली आहे, जी 1,638.17 डॉलरवर आहे. त्याच वेळी, डॉजकॉइन 0.089 डॉलरवर असून 0.8 टक्क्यांनी घसरली आहे.
Table of contents [Show]
भारतातील क्रिप्टोकरन्सी किंमत
बिटकॉइनची किंमत
भारतातील बिटकॉइनमध्ये गेल्या 24 तासांत 1.79 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी 1,886,157.23 रुपयांवर आहे. गेल्या सात दिवसांत या नाण्याने 7.57 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
इथरियमची किंमत
गेल्या 24 तासात 0.48 टक्क्यांच्या वाढीसह हे नाणे 133,820.93 रुपयांवर ट्रेड करत आहे.
टिथरचे दर
या डिजिटल नाण्याने गेल्या 24 तासात 0.05 टक्क्यांनी झेप घेतली असून तो 81.66 रुपयांवर आहे. दुसरीकडे, यूएसडी कॉईन देखील 0.5 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 81.65 रुपयांवर आहे.
डॉजकॉइनची किंमत
हे डिजिटल नाणे गेल्या 24 तासांत 0.31 टक्क्यांनी वाढून 7.36 रुपयांवर ट्रेड करत होते.