क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज शुक्रवारी 8 डिसेंबर 2022 रोजी घसरण झाली. नफावसुलीने आज प्रमुख क्रिप्टो चलनांच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.बिटकॉइन,इथेरियम या चलनांच्या किंमतींना फटका बसला.बिटकॉइनचा भाव 16838 डॉलर या पातळीवर घसरला.
ग्लोबल क्रिप्टो मार्केटचे बाजार भांडवल 842 बिलियन डॉलर्स इतके कमी झाली.त्यात गुरुवारच्या तुलनेत 2% ने घट झाली.मात्र उलाढाल4% ने वाढली. आजच्या उलाढालीत 37.05 बिलियन डॉलर्सची वाढ झाली.कॉइनमार्केटकॅप या एक्सचेंजनुसार आज इथेरियमच्या किंमतीत देखील घसरण दिसून आली. इथेरियमचा भाव 0.02% ने घसरला. तो 1240.08 डॉलर इतका झाला.तिथेरचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. त्याशिवाय बीएनबीच्या किंमतीत 0.27% वाढ झाली आहे. बीएनबी कॉइनचा भाव 285.86 डॉलर इतका आहे.
यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर असून बायनान्स कॉइनचा देखील 1.00 डॉलरवर स्थिर आहे. सोलानाचा भाव 13.50 डॉलर असून त्यात 0.05% वाढ झाली. लिटेकॉइनचा दर 75.76 डॉलर इतका आहे. त्यात 0.10% घसरण झाली.पॉलकाडॉटचा भाव 5.31 डॉलर इतका आहे.शिबू इनूच्या किंमतीत मात्र किंचित वाढ झाली.शिबू इनूचा भाव 0.02% ने वाढला आणि तो 0.0000091 डॉलर इतका झाला.डोजकॉइनचा भाव 0.30% ने वाढला असून तो 0.09डॉलर इतका आहे.