क्रिप्टो करन्सीच्या अस्तित्वाबाबत फेडरल रिझर्व्हने शंका उपस्थित केल्यानंतर जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला असून आज सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख चलनांच्या किंमतीत घसरण झाली. आजच्या घसरणीने बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली आला.
वर्ल्ड क्रिप्टो मार्केटमध्ये आज शनिवारी 17 डिसेंबर 2022 रोजी मोठी घसरण दिसून आली. बिटकॉइन, इथेरियम, बायनान्स या प्रमुख चलनांच्या किंमतीत आज घसरण झाली. आज एकूण मार्केटमधील उलाढाल देखील 5.68% ने कमी झाली असून ती 801.7 बिलियन डॉलर इतकी होती.
आजच्या सत्रात बिटकॉइनचा भाव पुन्हा 17000 डॉलरखाली घसरला. बिटकॉइनच्या किंमतीत 4.22% घसरण झाली. तो 16686.58 डॉलरवर ट्रेड करत आहे. बिटकॉइनची उलाढाल 25.57% ने कमी झाली. इथेरियमचा भाव 2.69% ने कमी झाला आहे. एका इथेरिमय कॉइनचा भाव 1181.01 डॉलर इतका आहे.
तिथेरचा भाव 1.00 डॉलरवर स्थिर आहे. यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर आहे. बीएनबी कॉइनच्या किंमतीत आज 5.74% घसरण झाली. बीएनबी कॉइनचा भाव 237.19 डॉलर इतका आहे. एक्सआरपी, पॉलीगॉन, लिट्टेकॉइन या क्रिप्टो करन्सींच्या किंमतीत आज घसरण झाली. एक्सआरपीचा भाव 0.35 डॉलर आहे. डॉजकॉइनचा भाव 0.077 डॉलर असून कार्डानोचा भाव 0.26 डॉलर आहे.
FTX एक्सचेंज घोटाळ्याप्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. FTX चा संस्थापक आणि माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेडला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाती धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलकाडॉट कॉइनचा भाव 4.68 डॉलर आहे. त्यात मागील 24 तासांत 8.22% इतकी घसरण झाली. लिटेकॉइनचा भाव 63.67 डॉलर असून त्यात 8.12% घसरण झाली आहे. सोलाना कॉइनचा भाव 12.30 डॉलर असून त्यात 8.83% घसरण झाली.