Crypto Hack 2022 : बायनान्स (Binance) या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजला जवळजवळ 500 मिलिअन डॉलर्सचा (4,120.91 कोटी रुपये) फटका बसला आहे. त्यांचे नेटवर्क हॅक झाल्याने हे मोठे संकट एक्सचेंजवर आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दोन ब्लॉकचेनमध्ये चुका सापडल्याने त्यांनी सर्व व्यवहार आणि फंडसची देवाणघेवाण थांबवल्याचे सांगितले जात आहे. बायनान्सचे सीईओ चांगपेंग झाओ (Changpeng Zhao, CEO of Binance) यांनी एका ट्विट्मध्ये सांगितले की, “BNB चेनमध्ये वापरल्या जाणार्या ब्लॉकचेन "ब्रिज"वरून टोकन चोरीला गेले होते, जे फेब्रुवारीपर्यंत Binance स्मार्ट चेन म्हणून ओळखले जात होते”. ब्लॉकचेन ब्रिज हे क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे.
Table of contents [Show]
570 मिलिअन डॉलर्सच्या कॉईन्सची चोरी!
झाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी 2 मिलिअन BNB क्रिप्टोकरन्सी चोरले आहेत. ज्याची किंमत 570 मिलिअन डॉलर्स होती. हॅकर्सच्या डिजिटल वॉलेटमधून काही क्रिप्टोकरन्सी रिकव्हर करण्यात कंपनीला यश आले. परंतु अजूनही 100 मिलिअन डॉलर्सचे कॉईन रिकव्हर झालेले नाहीत. BNB ही पूर्वी बायनान्स कॉईन (Binance Coin) म्हणून ओळखली जात होती. ती आज व्हॉल्यूमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. तिचे बाजारातील भांडवल 45 बिलिअन डॉलर्स (3,70,882 कोटी रुपये) एवढे आहे. एवढी मोठी क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटलाच मोठा धक्का बसला आहे.
वर्षभरात 13 क्रिप्टोकरन्सीज् हॅक!
Cryptocurrencies are digital or virtual currencies underpinned by cryptographic systems. They enable secure online payments without the use of third-party intermediaries. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी ही क्रिप्टोग्राफिक सिस्टीमद्वारे आधारलेली डिजिटल किंवा आभासी चलन आहे. ते थर्ड पार्टीचा वापर न करता सुरक्षित ऑनलाईन पेमेंट करण्यास सक्षम आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी तयार करण्यामागचा मूळ उद्देश स्पष्टपणे दिला आहे. त्यात असे म्हटले आहे की, सुरक्षित ऑनलाईन पेमेंट करता यावे यासाठी त्यांना तयार करण्यात आले आहे. मग असे असतानाही या वर्षभरात हॅकर्सनी 13 क्रिप्टोकरन्सीज हॅक करून अंदाजे 2 बिलिअन डॉलर्स चोरले?
क्रिप्टोकरन्सी इकोसिस्टिम हॅकिंगसाठी कारणीभूत?
क्रिप्टोकरन्सीजचे मूळ उद्दिष्ट सुरक्षितता असताना हॅकिंग होतेच कशी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. क्रिप्टोकरन्सीची एक नेहमी दुर्लक्षित केली जाणारी बाजू म्हणजे, त्यामध्ये सहभागी असलेल्या कंपन्या आणि मध्यस्थ संस्था. प्रत्येक जण एका क्रिप्टोकरन्सीच्या वेगवेगळ्या स्तरांसाठी सॉफ्टवेअर तयार करत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या संस्थांकडे वेगवेगळ्या खातेवह्या तयार होतात, ज्या प्रत्येक देवाणघेवाणीची नोंद करत असतात. वेगवेगळ्या कंपन्या लोकांसाठी या क्रिप्टोकरन्सीज ठेवण्यासाठी डिजिटल वॉलेट्स तयार करतात. यात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस पण येतात. या वेगवेगळ्या पायऱ्यांमुळे क्रिप्टोकरन्सी इकोसिस्टिम (Cryptocurrency Ecosystem) तयार होते. जी हॅकिंग करणाऱ्यांसाठी एक संधी बनते. आतापर्यंत झालेल्या मोठमोठ्या क्रिप्टोकरन्सी हॅकिंगमधील कॉमन कारण म्हणजे क्रिप्टो एक्सचेंजेसद्वारे ग्राहकांच्या क्रेडेन्शियल्सची अपुरी सुरक्षितता हे आहे.
तुमचे कॉईन्स सेफ आहेत का?
हे सगळं वाचून तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आले असतील की, माझे कॉईन्स सेफ आहेत का? त्याच्या सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे? पण क्रिप्टो वापरकर्ता म्हणून प्रत्येक युझरला आपले खाते सुरक्षित ठेवावेच लागते. पण ज्या कंपन्यांच्या भरवशावर आपण हे खाते सुरू करतो किंवा क्रिप्टोचे व्यवहार करतो. त्या कंपन्या विश्वासार्ह आहेत का? त्या गुंतवणूकदारांना 100 टक्के सुरक्षितता देतात का? हे सुद्ध तितकेच महत्त्वाचे आहे. कारण गुंतवणूकदारांना सुरक्षित व्यवहार करता यावेत. ही एक्सचेंज कंपन्यांची जबाबदारी आहे. पण तरीही क्रिप्टोमार्केटमध्ये व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. कारण ती जर पाळली गेली नाही तर त्यामधून तुमचेच नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.