Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Explainer : 'FTX'चा डोलारा कोसळला! 'FTX' मुळे क्रिप्टो मार्केटला हादरे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Sam Bankman-Fried , FTX Collapsed, FTX, Crypto Exchange, BInance

Image Source : www.twitter.com

'FTX' वर्ल्ड क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये मागील आठवडाभरापासून प्रचंड घसरण झाली आहे. या पडझडीचे मूळ कारण बनली आहे ती अमेरिकेतील FTX कंपनी, जी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून लाखो क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान सोसावे लागले आहे.

जागतिक पातळीवरील मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी 'FTX' या क्रिप्टो एक्सचेंजने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. (FTX.com Filed For Bankruptcy) 'FTX' मधील अनागोंदी, सीईओ सॅम बँकमन फ्रेड याचा राजीनामा आणि गुंतवणूकदारांची पैसे काढून घेण्यासाठी उडालेली झुंबड यामुळे एकूणच क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये सध्या प्रचंड अस्थिरता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात बिटकॉइन (Bitcoin), इथेरिअम (Ethereum), बायनान्स (Binance) सारख्या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली आहे.

दरम्यान, 'FTX'मध्ये गुंतवणूक केलेल्या लाखो गुंतवणूकदारांना मात्र यामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. केवळ 'FTX' टोकन्सच्या (FTT) किंमतीत नव्हे तर बिटकॉईनसारख्या लोकप्रिय क्रिप्टो करन्सींच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनचे मूल्य 16500 डॉलर इतके खाली आले आहे. मागील दोन वर्षातील बिटकॉइनचा सर्वात कमी दर आहे.

'FTX' कडून FTT टोकन इश्यू केले जातात. FTT मध्ये तब्बल 10 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचे बोलले जाते. त्यापैकी 6 बिलियन डॉलर्स गुंतवणूकदारांनी मागील काही दिवसांत काढून घेतले आहेत. यामुळे 'FTX' आठवडाभर पैसे काढून घेण्यावर बंदी घातली होती.  'FTX' ने यातून  मार्ग काढण्यासाठी Tron या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मशी करार केला आहे. यातून 'FTX'चे काही टोक्न्स इतर क्रिप्टो वॉलेटमध्ये हस्तांतरित करुन सुरक्षित केले जाणार आहेत.

'FTX'चा डोलारा कोसळण्याची कारणे  

  • 'FTX' हा जगातील दुसरा मोठा क्रिप्टो एक्सचेंज आहे. बहामामध्ये या एक्सचेंजचे कार्यालय आहे. 
  • अमेरिकेसह जगभरातील एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी 'FTX' मधून गुंतवणूक केली आहे.
  • 'FTX'कडील एकूण मालमत्ता 10 ते 50 बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे.
  • 'FTX'ने गुंतवणूकदारांचा पैसा अति जोखमेच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवल्याचे माहिती समोर आली आहे. 
  • क्रिप्टोचा कायदा व्हावा यासाठी लॉबिंगकरिता 'FTX'चा सीईओ सॅम बँकमन फ्रेडने लाखो डॉलर्स खर्च  केले.
  • Alameda Research या हेज फंड आणि 'FTX' मध्ये व्यावयासिक संबध आहेत. 'FTX' आर्थिक संकटाला Alameda Research  कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
  • 'FTX'ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केल्यांनतर अवघ्या 72 तासांत गुंतवणूकदारांनी तब्बल 6 बिलियन डॉलर्स काढून घेतले.
  • आर्थिक संकट गडद बनल्याने गेल्या आठवड्यात 'FTX' ने गुंतवणूकदारांना पैसे काढून घेण्यावर आठवडाभर मनाई केली होती. 
  • दरम्यान, मे 2022 मध्ये जेव्हा क्रिप्टो मार्केटमध्ये 2 लाख कोटी डॉलर्सचा क्रॅश झाला होता तेव्हा याच 'FTX' ने अनेक छोट्या क्रिप्टो एक्सचेंजसला संकटातून बाहेर काढले होते.
  • या संपूर्ण प्रकरणात FTT चे मूल्य तब्बल 80% कोसळला आहे. एकाच दिवशी यात 20% घसरण झाली होती.

बायनान्सबरोबर व्यवहार फिस्कटला अन् 'FTX'चा घात झाला (Binance Scrap Deal With FTX) 

जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज बायनान्सने 'FTX' ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची तयारी दर्शवली होती. मूळात बायनान्सची देखील 'FTX'मध्ये गुंतवणूक आहे. मात्र बायनान्सचे मालक चॅंगपेंग झाओ यांनी ऐनवेळी 'FTX' बाबत भूमिका बदलली.'FTX' मधील अनागोंदी, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव आणि निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनात आल्याने झाओ यांनी 'FTX' खरेदीचा व्यवहार रद्द केला. इतक्यावरच न थांबता झाओ यांनी 'FTX' चे डिजिटल टोकन्स विक्री केले आणि गुंतवणूक काढून घेतली.ज्याचा मोठा फटका 'FTX' ला बसला.

'किंग ऑफ क्रिप्टो' सॅम बँकमन फ्रेड'ठरला व्हिलन (FTX CEO Sam Bankman-Fried Resigned)

जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांना सध्या प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. 'FTX' एक्सचेंज दिवाळखोरी जाण्याच्या शक्यतेने गुंतणूकदार धास्तावले आहेत. 'FTX' चा मालक आणि सीईओ सॅम बँकमन फ्रेड याने गुंतणूकदारांचे पैसे अमेरिकेत राजकीय नेत्यांवर खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीबाबत कायदा मंजूर करण्यासाठी सॅम बँकमन फ्रेडने अमेरिकन नेत्यांबरोबर लॉबींग केले होते. यासाठी त्याने लाखो डॉलर्स खर्च केल्याचे बोलले जाते. मात्र 'FTX' मधील अनागोंदी आणि गैरकारभाराची प्रकरणे एकामागून एक बाहेर आल्याने किंग ऑफ क्रिप्टो'सॅम बँकमन फ्रेड'ने सीईओ पदाचा राजीनामा देऊन पळ काढला.  

लेहमन ब्रदर्स क्रॅशची झाली आठवण

सुमारे 14 वर्षापूर्वी लेहमन ब्रदर्स ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने अमेरिकेतील फायनान्शिअल मार्केट कोसळले होते. आताही तशीच परिस्थिती ओढावली आहे मात्र ती बँकिंग किंवा फायनान्शिअल मार्केट नसून क्रिप्टो मार्केट आहे. बायनान्स आणि 'FTX' हे दोन मोठे क्रिप्टो एक्सचेंज गुंतवणूकदारांना विविध क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीची सेवा देतात. मात्र आजच्या घडीला या दोन्ही एक्सचेंजला अमेरिकेत कायदेशीर मान्यता नाही. या दोन्ही कंपन्यांच्या अमेरिकेत उपकंपन्या आहेत ज्या तेथील नियमांचे पालन करतात. मात्र कायदेशीर मान्यता नसल्याने क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक अति जोखमीची मानली जाते.