क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये तेजी कायम आहे.आज बुधवारी प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत वाढ झाली.बिटकॉइनचा भाव 18000 डॉलरनजीक पोहोचला. इथेरियमच्या किंमतीत देखील आज मोठी तेजी दिसून आली.इथेरियमचा भाव 1300 डॉलरपर्यंत गेला आहे. सोलानाचा भाव 6% आणि शिबू इनुचा भाव 4% ने वाढला.
कॉइनमार्केटकॅपनुसार सध्या बिटकॉइनचा भाव 17881.35 डॉलर इतका आहे. त्यात मागील 24 तासांत 1% वाढ झाली.बिटकॉइनचा भाव 17197 डॉलर ते 17897 डॉलर या दरम्यान होता. आजच्या सत्रात बिटकॉइनच्या उलाढालीत तब्बल 51% वाढ झाली.
इथेरियमचा भाव 1327.59 डॉलर इतका असून त्यात 1% वाढ झाली.तिथेरचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. बीएनबी कॉइनच्या किंमतीत मात्र घसरण झाली. बीएनबी कॉइनचा भाव 269.56 डॉलर इतका आहे. एक्सआरपी कॉइनचा भाव 0.39 डॉलर इतका आहे.मागील 24 तासांत ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केटची उलाढाल 872.32 बिलियन डॉलर्स इतकी होती.त्यात 3% वाढ झाली.एकूण उलाढाल तब्बल 30 % ने वाढली असून ती 53.21 बिलियन डॉलर इतकी होती.
आज बायनान्स USDC कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली. बायनान्स USDC 0.99 डॉलर इतका आहे. जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या बायनान्सने USDC कॉइन्समधील गुंतवणूक काढण्यावर निर्बंध घातले आहेत. Toncoin (TON)चा भाव 13.35% ने वाढला असून त्याचा भाव 2.39 डॉलर इतका होता. Neutrino USD (USDN) च्या किंमतीत 11.67% वाढ झाली असून त्याचा भाव 0.70 डॉलर इतका आहे.